Maharashtra Political Crisis | संजय राऊतांचा बंडखोरांना टोला; म्हणाले – ‘जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेना नेत्यांची (Shivsena Leader) बंडखोर आमदारांवरील आरोप, टिका-टिप्पणी सुरूच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल बंडखोर आमदारांना राजीनामे द्या आणि निवडणूक लढवा, असे आव्हान दिले होते. शिवसेना नेते संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सुद्धा सातत्याने बंडखोरांना लक्ष्य करत आहेत. आजा पुन्हा संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आरसा दाखवला आहे. यासाठी राऊत यांनी ट्विटरवर आरसा पाहणार्‍या एका अस्वालाचा व्हिडिओ शेअर केला आहे. (Maharashtra Political Crisis)

 

संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओत एक अस्वल दिसत आहे. या अस्वलासमोर आरसा येताच ते स्वत:लाच पाहून गांगरलेले दिसते. हाच धागा पकडत संजय राऊत यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांना आरसा दाखवला आहे. जेव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते, अशी टिप्पणी राऊत यांनी केली आहे. (Maharashtra Political Crisis)

 

तत्पूर्वी संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोला विठ्ठल… विठ्ठल… विठ्ठल… असे कॅप्शन दिले आहे. बाळासाहेब हेच आमचे विठ्ठल असे त्यांना यातून सूचित करायचे आहे.

संजय राऊत यांनी सामनाच्या लेखातूनही बंडखोर आमदार आणि भाजपाला टिका केली आहे.
रोखठोक सदरात राऊत यांनी म्हटले आहे की, शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केले,
त्याच्याशी भाजपचा संबंध नाही असे सांगणारे भाजपवाले उघडे पडले.
शिंदे यांनीच पडद्यामागचे सारे कारस्थान विधानसभेत फोडले व
आता सौ. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीच घरातील गुपित फोडले.
अमृता यांनी गुपित फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | Shivsena leader and mp sanjay raut again taunts
shiv sena rebel mla after eknath shinde and devendra fadnavis govt came in power

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा