Maharashtra Political Crisis | शिंदे गटाकडून 50 कोटींहून अधिकची ऑफर, आमदार उदयसिंग राजपूत यांचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | बंडखोर शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सूरतमधून सुरू केलेले बंड गुवाहाटीमार्गे आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहचले आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना निलंबन नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आपला गट टिकवून ठेवण्यासाठी आणि संख्याबळ वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. आज कोकणातील शिवसेनेचे आणखी एक मंत्री उदय सामंत (Uday Samant) शिंदे गटात सामील झाले. यानंतर आमदार फोडाफोडी संदर्भात आता आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. (Maharashtra Political Crisis)

 

दोन चारचाकी भरुन पैसे आले

शिंदे गटात सहभागी होण्यासाठी 50 कोटींहून अधिकची ऑफर मिळाल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत (Shivsena MLA Udaysingh Rajput) यांनी केला आहे. राजपूत यांच्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेजही असल्याचा दावा उदयसिंग राजपूत यांनी केला आहे.

 

बंडाला मिळू शकते नवे वळण

उदयसिंग राजपूत यांनी म्हटले की, शंभर कोटी दिले तरीही गद्दारी करणार नाही. उदयसिंग राजपूत हे औरंगाबादच्या कन्नडचे आमदार आहेत. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता शिवसेनेतल्या बंडाला नवे वळण मिळू शकते. (Maharashtra Political Crisis)

 

मी तत्त्व आणि निष्ठेला महत्त्व देणारा

एका शिवसैनिकाशी बोलतानाची उदयसिंग राजपूत यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात ते ऑफर स्वीकारली नाही. कारण मी तत्त्व आणि निष्ठेला महत्त्व देणारा आहे. शिंदे मला मंत्रीही करू शकतील, पण मला पदाचा हव्यास नाही. मी शिवसेनेतच राहणार आहे, असे म्हटले आहे.

 

शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीचा शिवसेनेला जोरदार फटका बसला आहे. कधीही नव्हे इतकी शिवसेना फुटली आहे.
आता शिवसेनेने आक्रमक धोरण स्वीकारले आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत मेळावे घेतले.
या मेळाव्यात बंडखोरांवर जोरदार टीका करण्यात आली. तसेच राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde group offers over rs 50 crore claims mla uday singh rajput maharashtra political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा