Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या निकाल, न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उद्या (गुरुवार) निकाल देणार आहे. त्यामुळे शिंदे सरकार (Shinde Government) राहणार की जाणार याचा फैसला उद्याच कळणार आहे. तसेच 16 आमदार अपात्र (MLA Disqualified) ठरणार की पात्र ठरणार याबद्दल निकाल येणार आहे. त्यामुळे उद्या मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना धनुष्यबाण पक्ष चिन्ह (Shivsena Dhanushyaban Symbol) आणि शिवसेना पक्ष नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिंदे गटाला (Shinde Group) दिल्याने ठाकरे गटाने या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात (Maharashtra Political Crisis) आव्हान दिले होते. या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली असून याप्रकरणी उद्याच निकाल जाहीर होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड (Justice D.Y. Chandrachud) यांनी जाहीर केलं आहे. उद्या दोन घटनापीठाचे (Constitution Bench) निकाल जाहीर होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या वर्षी 30 जून रोजी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मुख्यमंत्रिपदाची आणि
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
तत्पूर्वी सूरत ते गुवाहाटी आणि तेथून गोवामार्गे महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर
चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल यांची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Web Title :-   Maharashtra Political Crisis | supreme court constitution bench to deliver the judgment in shivsena case tomorrow says cji dy chandrachud

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘…तर ठाकरेंचे कपडे फाडणार’ नितेश राणेंच्या वक्तव्याला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ठाकरेंचे कपडे फाडण्याचा दम…’

Chitra Wagh On Sanjay Raut | ‘पंतप्रधानांवर बोलण्याची तुमची लायकी नाही’, संजय राऊतांच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

Maharashtra Political Crisis | शिंदे सरकार राहणार की जाणार? न्यायालयाच्या निकालापूर्वी विधानसभा अध्यक्षांचे महत्त्वाचं विधान

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 16 हजाराच्या लाच प्रकरणी महिला कनिष्ठ सहाय्यकासह शिक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात