Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, ठाकरे गटाची ‘ती’ मागणी फेटळली; पुढील सुनावणी मेरीटवर सुरु होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मागील अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये नबाम रेबिया निकालाच्या (Nabam Rabies Result) फेरविचारासाठी सात सदस्यांचे घटनापीठ (Constitutional Court) स्थापन करावे की नाही? याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण (Maharashtra Political Crisis) सात जणांच्या घटनापीठाकडे जाणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, आज सुनावणी सुरु होताच पहिल्या सत्रात सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता येत्या 21 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी सुरु झाल्यानंतर पुढची तारीख देण्यात आली. तसेच हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार आहे. 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण देण्याची मागणी ठाकरे गटाने (Thackeray Group) केली होती. मात्र न्यायालयाने हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हा ठाकरे गटाला धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे.

शुक्रवारी सरन्यायाधीश चंद्रचूड (Chief Justice Chandrachud) यांनी एक पानी निकालाचे वाचन केले.
यामध्ये नबाम रेबिया प्रकरणाच्या गुणवत्तेवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर नबाम रेबियाचे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे जाण्यासाठी पात्र नाही,
त्यामुळे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे राहणार आहे. 21 आणि 22 फेब्रुवारीला याची नियमित सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे प्रकरण (Maharashtra Political Crisis) ज्या गतीने सुप्रीम कोर्टात सुरु आहे.
यावरुन एप्रिल किंवा मे महिन्यात या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील सुनावणी ही मेरीटवर सुरु होणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | supreme court hearing on sena factions today february 17 result petitions filed by rival factions uddhav thackeray and chief minister eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rudraksh Mahotsav in Sehore | धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये झालेल्या धक्काबुक्कीत बुलडाण्यातील 3 महिला बेपत्ता

Pune Crime News | पत्नीचा गळा दाबून खून करुन पतीने विष प्राशन करुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना