Maharashtra Political Crisis | राज्यातील सत्तासंघर्ष आता 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे, ‘या’ मुद्यावर होणार निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) झाली आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वेगळा गट स्थापन करुन भाजपसोबत (BJP) युती केली. त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष चे प्रकरण (Maharashtra Political Crisis) हे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे (Justice Constitution Bench) सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय सरन्यायाधीश रमण्णा (Chief Justice Ramanna) यांच्या नेतत्वातील तीन सदस्यीय खंडपीठाने घेतला आहे. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होणार आहे. निवडणूक आयोगासमोर (Election Commission) प्रलंबित असणाऱ्या मुद्यांवर सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे निर्देश देण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
घटनापीठासमोर काही मुद्यांवर सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होईल.

 

घटनापीठ कोणत्या मुद्यावर निर्णय घेणार ?

विधानसभा अध्यक्षांविरोधात (Assembly Speaker) अविश्वास ठराव प्रलंबित असताना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करु शकतात का ?

या दरम्यान सभागृहाचे कामकाज कसे सुरु राहिल ?

राजकीय पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि त्यात निवडणूक आयोगाची भूमिका या मुद्यांवर घटनापीठ सुनावणी करणार आहेत.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | supreme court hearing on shiv sena vs cm eknath shinde decision will be taken by the constitutional benches on this issue

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा