Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर उद्या निकाल, राज्यात हालचालिंना वेग; दोन्ही गटाचे शिलेदार दिल्लीला रवाना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या (गुरुवार) येण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadnavis Government) भविष्य उद्याच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, निकाल जवळ आल्याने राज्यात राजकीय हालचालींना (Maharashtra Political Crisis) वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) वकिलांसह तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. तर ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते अनिल देसाई (Anil Desai) हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष याबाबत (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) झालेल्या सुनावणीवर उद्या निकाल येण्याची शक्यता आहे. कारण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Justice Dhananjay Chandrachud) यांनी उद्या दोन प्रकरणांवरील निकाल देणार आहोत, असं सांगितलं आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांनी उल्लेख केलेल्या दोन प्रकरणांमधील एक प्रकरण हे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे वकिलांसोबत तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे नेते अनिल देसाई हे देखील दिल्लीकडे काहीवेळात रवाना होणार आहे. दोन्ही पक्षांचे हे शिलेदार आज संध्याकाळपर्यंत दिल्लीत पोहचणार आहेत.

वकिलांचे म्हणणे काय?

सुप्रीम कोर्टात उद्या जर निकाल येणार असेल, तर तो साधारण सकाळी 11 वाजताच्या सुमारास येईल.
निकाल ज्यांनी लिहिला आहे ते एकच न्यायमूर्ती तो निकाल वाचून दाखवतील.
त्यातील ऑपरेटिव्ह पार्ट न्यायमूर्ती वाचून दाखवतात. त्यावर नंतर सगळे न्यायमूर्ती सह्या करतात आणि त्यात
दुमत असेल, तर ते न्यायमूर्तीही त्याचा ऑपरेटिव्ह पार्ट वाचतात, अशी माहिती अॅड. सिद्धार्थ शिंदे (Adv. Siddharth Shinde) यांनी दिली.

16 आमदारांचं काय होणार?

सत्तासंघर्षातील ज्या प्रलंबित याचिका आहेत त्या सगळ्यांचा निकाल एकत्रित लागण्याची शक्यता आहे.
16 आमदार अपात्रतेसंदर्भात (MLA Disqualified) निर्णय कोणी घ्यायचा हा मूळ प्रश्न असणार आहे.
घटनेच्या दहाव्या परिस्थितीनुसार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) घेतात. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी 16 आमदारांना आपात्रतेची नोटीस बजावली होती.
परंतु, त्या आमदारांनी उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.
उपाध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेता येत नसल्याने सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेत याकडे
सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde), संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), अब्दुल सत्तार (Abdul Sattar),
तानाजी सावंत (Tanaji Sawant), संजय शिरसाट (Sanjay Shirsat), यामिनी जाधव (Yamini Jadhav),
चिमणराव पाटील (Chimanrao Patil), भरत गोगावले (Bharat Gogavle), लता सोनावणे (Lata Sonawane),
रमेश बोरणारे (Ramesh Borwane), प्रकाश सुर्वे (Prakash Surve), बालाजी किणीकर (Balaji Kinikar),
महेश शिंदे (Mahesh Shinde), अनिल बाबर (Anil Babar), संजय रायमुलकर (Sanjay Raimulkar),
बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar)

Web Title :- Maharashtra Political Crisis | supreme court will decision tomorrow on the dispute between shiv sena and shinde group rahul shewale and anil desai going to delhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-2 कडून 7 गुन्हे उघडकीस

Maharashtra Politics News | ‘मविआचे नेते शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, हे जबाबदारीने सांगतोय’

Devendra Fadnavis | ‘आम्ही जे केलंय ते सगळं…’, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान (व्हिडिओ)