Maharashtra Political Crisis | धनुष्यबाण आणि शिवसेना कुणाची? यावर निवडणुक आयोगापुढे आज पुन्हा सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | शिवसेना (Shivsena) पक्षातील फूटीनंतर पक्षात दोन गट आस्तिवात आले. त्यानंतर दोन्ही गटांनी शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण या पक्षचिन्हावर आपला दावा केला. त्यानंतर या संबंधीच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court Of India) आणि निवडणुक आयोगापुढे (Election Commission Of India) सुनावणी सुरू आहे. नुकतच दि.१७ जानेवारीला निवडणुक आयोगासमोर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हावर सुनावणी झाली. त्यावेळी निवडणुक आयोगाने ही सुनावणी पुढे ढकलून दि.२० रोजी घेण्याचे सांगितले. त्यानुसार आज (दि.२०) निवडणुक आयोगापुढे ही सुनावणी होणार आहे. (Maharashtra Political Crisis)

 

दि.१७ जानेवारीला झालेल्या सुनावणीत निवडणुक आयोगाकडून शिवसेनेच्या दोन्ही गटांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीच आहे. शिवसेनेत फूट पडलीच नाही. जी फूट पडल्याचे भासवले जात आहे. ते कपोलकल्पित आहे. असा दावा ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल (Advocate Kapil Sibbal) यांनी केला. तसेच ही फूट ग्राह्य धरण्यात येवू नये. आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये. अशी मागणी देखील युक्तीवाद करताना कपिल सिब्बल यांनी केली. (Maharashtra Political Crisis)

त्यावर प्रतिवाद करताना शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी (Advocate Mahesh Jethmalani) म्हणाले की, आमच्याकडे आमदार आणि खासदार यांचे संख्याबळ आहे. त्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. सुप्रीम कोर्टात अद्याप कुणाचेही निलंबण करण्यात आलेले नाही. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अशी मागणी शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांनी केली.

 

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १३ खासदार सोबत घेऊन शिवसेना मुळ पक्षासोबत बंडखोरी केली होती. त्यानंतर राज्यातील तत्कालिन ठाकरे सरकार कोसळले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. मात्र, एवढा मोठा गट पक्षातून बाहेर पडल्यानंतर खरी शिवसेना कोणाची? असा सवाल उपस्थित झाला. त्यासंदर्भात शिंदे गटाने निवडणुक आयोगात याचिका दाखल केली होती. त्यावर निवडणुक आयोगात सुनावणी सुरू आहे.

यावर बोलताना घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) म्हणाले की, ‘कोणत्याही पक्षाच्या राज्यघटनेची निवडणूक आयोगाकडे नोंद केली जाते.
कलम २९ (अ) नुसार, राजकीय पक्षाची नोंदणी करताना निवडणूक आयोगाकडे पक्षाची राज्यघटना द्यावी लागते.
त्यामुळे सध्या निवडणूक आयोगाकडे जी घटना आहे, ती उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेची घटना आहे.
त्यानुसारच निवडणूक आयोगाकडून सगळा विचार केला जाईल.’
त्यामुळे आता निवडणुक आयोगाकडून यावर काय निर्णय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | thackeray and shinde group will face off in front of election commission today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा