Maharashtra Political Crisis | ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असं शिंदे गटाचं नाव ? एकनाथ शिंदे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात वातावरण (Maharashtra Political Crisis) चांगलंच तापलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळतो आहे. यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचं नाव अखेर जाहीर केलं असल्याची माहिती समोर आली आहे. ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ (Shivsena Balasaheb Thackeray) असं या गटाला नाव देण्यात आल्याची माहिती आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाला ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ गट असं नाव दिलं आहे. दरम्यान या नव्या गटाची अधिकृत घोषणा आज करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान यानंतर सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे काेणत्या मार्गाने निर्णय घेतात हे पहावे लागत आहे. मात्र शिंदे गटांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं गटाचं नाव दिलं आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक यांच्यात आणखी संघर्ष होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political Crisis)

 

दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की, “आम्ही कायम शिवसेनेतच राहणार, आम्ही कोणता गट स्थापन केला नाही.” असं एकनाथ शिेंदे यांनी म्हटलं आहे. तसेच, “बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणार.” असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नवा गट स्थापन करणार का नाही ? याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | The name of Shinde group as Shiv Sena Balasaheb Thackeray Eknath Shinde said

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा