Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या ‘फुटी’ मागील खरे कारण पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समोर येणार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट निर्माण केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) धोक्यात आले आहे. बंडखोर गटाने भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने पुणे जिल्हा (Pune District) पातळीवरील स्थानीक राजकारणांत मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका (Pune Municipal Corporation) आणि जिल्हा परिषद (Pune ZP) निवडणुकीमध्ये याचे परिणाम पाहायला मिळणार असून शिंदेगटाच्या ‘फुटी’ मागील खरे कारणही या निवडणुकांच्या निकालातून समोर येणार आहे. (Maharashtra Political Crisis)

 

राज्यात भाजपसोबतच्या मोठ्या भावाची भूमिका पार पाडणार्‍या शिवसेनेला २०१४ लोकसभा निवडणुकीनंतर दुय्यम स्थानावर जावे लागले. लोकसभेनंतर अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने पुर्वीच्या सूत्रापेक्षा अधिकच्या जागा मागितल्याने युती तुटली. ज्या शिवसेनेमुळे भाजप महाराष्ट्राच्या मातीत खर्‍या अर्थाने रूजला त्याच भाजपने केंद्रात एकहाती सत्ता मिळाल्यानंतर शिवसेनेच्या वर्चस्वाला सुरूंग लावत २५ वर्षांची युती तोडली. या निवडणुकीमध्ये शिवसेना स्वबळावर लढली आणि ६४ जागांवर विजय मिळविला. पुणे शहरातील आठही मतदारसंघामध्ये विजय न मिळालेल्या शिवसेनेने पिंपरी (Pimpri Chinchwad), पुरंदर (Purandar) आणि खेडमध्ये (Khed) भगवा फडकवला. परंतू अवघ्या काही दिवसांतच भाजप आणि शिवसेनेची युती झाली. या युतीमध्ये जवळपास सर्वच ‘क्रिम’ खाती भाजपच्या वाट्याला गेली. केवळ सत्तेत राहून अस्तित्व टिकविण्यासाठीचा लढा काय तो शिवसेनेकडे उरला. या पाच वर्षाच्या कालावधीत शिवसेनेच्या एकाही मंत्र्याकडून पदाला साजेशी कामगिरी झाली नाही. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापुढे त्यांची कामे झाकोळून गेली. (Maharashtra Political Crisis)

नोटबंदीसारख्या निर्णयानंतर पुढील अर्थात २०१९ च्या लोकसभा निवडणुक देखिल युती म्हणूनच लढली गेली. या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे १८ खासदार विजयी झाले. परंतू अवजड उद्योगमंत्री अनंत गिते (Anant Gite), चार वेळचे खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Kaire) आणि शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यासारख्या दिग्गजांचा पराभव झाला. यापैकी दोन ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) तर एक ठिकाणी एमआयएमचे (MIM) उमेदवार विजयी झाले. यापैकी पुणे जिल्ह्यातील शिरूर (Shirur) मतदारसंघात ज्याठिकाणी बहुतांश आमदार भाजपचे होते तेथेच आढळराव पाटील हे पराभूत झाले.

 

या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीला भाजप शिवसेना युती सामोरी गेली. निवडणुक होण्यापुर्वी अंतिम टप्प्यात जलसंपदा विभाग तसेच राज्य सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपातून ऍन्टी करप्शन ब्युरोकडील (Maharashtra ACB) तक्रारीच्या आरोपातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना क्लिनचीट देण्यात आली. विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा या युतीच्या सूत्राप्रमाणे शहरातील आठपैकी एकही मतदारसंघ शिवसेनेच्या वाटयाला आला नाही. पिंपरी, पुरंदर, खेड आणि भोर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे तुल्यबळ उमेदवार होते. पुरंदरचे शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतरे (Vijay Shivtare) यांच्यासह पिंपरी आणि खेडचे आमदार सुरेश गोरे (Suresh Gore) आमदारांचाही पराभव झाला. खेड आणि भोरमध्ये भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. विधानसभेत जिल्ह्यात शिवसेना शून्यावर आली.

शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुणे जिल्ह्यातील संघटनेला बळच दिले नाही
२०१४ पासून भाजपसोबतची फरफट , पाचवर्षातील दुय्यम वागणुक आणि मुख्यमंत्री पदावरून बिनसल्यानंतर
शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या प्रमुख विरोधकांसोबतच राज्यात सत्ता स्थापन करून
अपमानाचा वचपा काढला. मुख्यमंत्री, नगरविकास सारखी महत्वाची पदे शिवसेनेच्या वाटयाला आली.
सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यांत कोरोना आला.
परंतू या कालावधीत पक्ष संघटना म्हणून मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुण्याकडे पाठच केली. विद्येचे…

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | The real reason behind the ‘split’ of Eknath Shinde group will come up in the local body elections in Pune district?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरु होऊ शकते’ – प्रकाश आंबेडकर

 

Maharashtra Political Crisis | प्रथमच शिंदेगटाची मोठी मागणी ! CM उद्धव ठाकरेंनी सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा

 

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला, लागोपाठ 30 दिवसांपासून रॉकेट स्पीड, जोरदार रिटर्न