Maharashtra Political Crisis | उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर शिंदे गटातील आमदाराच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत (Shivsena MLA) बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. यानंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोप होत असताना पुण्यात उदय सामंत यांच्या कारवर हल्ला (Uday Samant Car Attack In Pune ) करण्यात आला. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं (Maharashtra Political Crisis) असताना शिंदे गटातील (Shinde Group) आणखी एकाला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

आमदार (MLA) आणि शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Shinde group Pratod Bharat Gogawle) यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली आहे. गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले (Vikas Gogavele) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात (Gadevi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा धमकीचा फोन पहिला नाही. अज्ञात व्यक्तींकडून वारंवार धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Political Crisis)

 

विकास गोगावले यांनी सांगितले की, मला गेल्या दोन दिवसांपासून अनोळखी नंबरवरुन धमकीचे फोन येत आहेत. याशिवाय माझे वडील भरत गोगावले यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने धमकीचे फोन येत आहेत. तुम्ही पक्ष कसा वाढवतात ते आम्ही बघतो. आम्ही या गोष्टी टाळत होतो. पण वरिष्ठ पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी तक्रार करण्याची सूचना दिली. त्यानुसार आम्ही तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.

विकास गोगावले यांना फोनवर अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे.
फोनमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीने गोगावले यांना चार ते पाच दिवसांचा इशारा दिला आहे.
संबंधित धमकीच्या फोन प्रकरणी विकास गोगावले यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | threatening phone call to eknath shinde mla bharat gogovale son vikas gogavale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rain in Maharashtra | राज्यात पुढील 48 तासात मान्सुन पुन्हा सक्रिय होणार, ‘या’ भागात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

 

Osmanabad ACB Trap | अटक न करण्यासाठी 20 हजाराची लाच घेताना पोलीस एसीबीच्या ताब्यात

 

Shivsena MP Sanjay Raut | राऊतांच्या घरात सापडली डायरी, कोट्यावधींचा हिशोब कोडिंगमध्ये, राऊतांच्या अडचणीत वाढ?