Maharashtra Political Crisis | … तर पूर्वस्थिती पुन्हा आणता आली असती, उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक पडली महागात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा बहुप्रिक्षित निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एकीकडे माजी राज्यपाल कोश्यारी यांच्या (Governor Bhagat Singh Koshyari) भूमिकेवर कोर्टाने ताशेरे ओढले. तर दुसरीकडे शिंदेंच्या गटला दणका दिला आहे. पण, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय ही चूक होती, असं निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिलासा देण्यास नकार दिला आहे.

जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा (Resignation) दिला नसता तर आम्ही पूर्वस्थिती लागू करुन सरकार पुनर्स्थापित करण्याचे निर्देश दिले असे, असं सगळ्यात मोठं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा शिवसेना ठाकरे गटासाठी (Shiv Sena Thackeray Group) आणि महाविकास आघाडी सरकारसाठी (Maha Vikas Aghadi government) महत्त्वाचा ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात हाच राजीनाम्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरला असून एकनाथ शिंदे यांचे सरकार वाचले आहे. (Maharashtra Political Crisis)

पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने हा निकाल दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
(Chief Justice Dhananjay Chandrachud) यांनी हा निकाल वाचून दाखवला.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठात न्यायमूर्ती एम आर शहा (Justice MR Shah),
न्यायमूर्ती कृष्ण मुरारी (Justice Krishna Murari), न्यायमूर्ती हिमा कोहली (Justice Hima Kohli),
न्यायमूर्ती पी एस नरसिंहा (Justice PS Narasimha) यांचा समावेश आहे.

Web Title :-Maharashtra Political Crisis | uddhav thackeray should not have resigned as chief minister say supreme court maharashtra political crisis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर, खटला मोठया घटनापीठाकडे जाणार; शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार

Abdul Sattar | ‘झिरवळांचा खेळ आता संपला’, संजय राऊतांच्या ट्विटला अब्दुल सत्तार यांचे प्रत्युत्तर

Yerwada Jail News | येरवडा कारागृहात गजा मारणे टोळीचा राडा ! दुसर्‍या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात घातला पाट

ED Notice To NCP Leader Jayant Patil | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; 4 वर्षापूर्वी राज ठाकरे यांनाही पाठविली होती