Maharashtra Political Crisis | ’11 जुलैपर्यंत अधिवेशन बोलावून अविश्वास ठराव आणता येणार नाही’ – घटनातज्ज्ञ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह (Shivsena) महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीच्या 50 आमदारांनी सरकारचा पाठिंबा (Maharashtra Political Crisis) काढत असल्याचे याचिकेत म्हणत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली. ठाकरे विरुद्ध शिंदे या सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलेला सर्वात मोठा दिलासा दिला आहे. 16 बंडखोरांवर 12 जुलैपर्यंत कोणतीही कारवाई विधानसभा उपाध्यक्षांना (Assembly Vice President) करता येणार नाही. तसेच या कालावधीत राज्य सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव देखील आणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी दिली आहे.

 

उल्हास बापट म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सुस्पष्ट आहे. आमदारांना डिसक्वालिफाई (Disqualify) म्हणजे अपात्र ठरवण्यासाठी दिलेल्या नोटिशीतील 2 दिवसांचा कालावधी कमी आहे, तो किमान 7 दिवसांचा असावा असे त्यांनी म्हटले आहे. व्हेकेशन बेंच असल्याने आता पुढील सुनावणी 11 जुलैला होणार आहे. तोपर्यंत स्टेट स्को (State Sco) म्हणजे जैसे थे परिस्थिती ठेवावी लागणार. याचा अर्थ मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच (CM Uddhav Thackeray) असतील. त्यांचे मुख्यमंत्री पदाचे अधिकारही कायम असतील. ते त्यांचे मंत्री बदलू शकतात व शासकीय निर्णय घेऊ शकतात. या काळात म्हणजे 11 जुलैपर्यंत अधिवेशन बोलावून अविश्वास ठराव वगैरे आणता येणार नाही. जे काही होईल ते आता 11 जूलैच्या निर्णयानंतरच होईल. (Maharashtra Political Crisis)

सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर शिवसेनेतून वेगळे झालेल्या आमदारांना आता पुढील सुनावणीपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
11 जुलैच्या निर्णयानंतर अधिवेशन घेता येईल. राज्यपाल अधिवेशन बोलवतात, पण त्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला बंधनकारक आहे.
सरकार अल्पमतात गेले हे सिद्ध झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल.
मात्र, अल्पमतात आहे हे अधिवेशनात सिद्ध व्हावे लागेल. 11 जूलैच्या आधी आता ते शक्य नसल्याचे उल्हास बापट यांनी सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | until then the powers of the chief minister will remain information of ulhas bapat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या ‘फुटी’ मागील खरे कारण पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समोर येणार?

 

Best Business | छोटा बिझनेस-मोठा नफा, दरमहिना 5 लाखापर्यंत होईल कमाई!

 

Airtel Smart Recharge Plan | 28 दिवसांसाठी मिळेल कॉल आणि डेटाचा फायदा, किंमत 100 रुपयांपेक्षा सुद्धा कमी