16 आमदारांचा निर्णय कधी, कशी असेल प्रक्रिया? विधानसभा अध्यक्षांनी लंडनमधून दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. निकालात कोर्टाने राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. तसेच भरत गोगावले (Bharat Gogawale) हे व्हिप (Whip) बेकादेशीर असल्याचे सांगितले. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही परिस्थिती (Maharashtra Political Crisis) पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला असता, असेही कोर्टाने म्हटले. 16 आमदारांच्या अपात्रेबाबतचा (MLA Disqualified) निर्णय विधानसभा अध्यक्षांनी ठराविक कालावधीत घ्यावा, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले.

16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे असल्यामुळे आता राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राहुल नार्वेकर सध्या लंडन दौऱ्यावर असून तिथूनच त्यांनी ही प्रक्रिया कशी चालेल यासंदर्भात माहिती दिली.

राहुल नार्वेकर म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे (Maharashtra Political Crisis) स्वागत करतो. सुप्रीम कोर्टाने इंटरप्रिटेशन केले आहे, त्याआधारावर आपण योग्य ती सुनावणी घेऊ. हा निर्णय ठराविक कालाधीत घ्यायचा आहे, आमचंही तेच उद्दीष्ट आहे. आम्ही हा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करु.

प्रत्येकाची सुनावणी घेणार

सगळ्यात अगोदर राजकीय पक्ष (Political Party) कुणाचा आहे, या विषयाचा निर्णय घ्यायला न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे तो निर्णय आधी घेतला जाईल. हा निर्णय घेतल्यावर नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावरती आपण प्रत्येकाची सुनावणी घेऊ. प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी संधी दिली जाईल. दिवाणी न्यायालयात (Civil Court) ज्या प्रमाणे प्रक्रिया राबवली जाते तशीच प्रक्रिया याठीकाणी पार पाडावी लागेल. तपासणी आणि उलट तपासणी करावी लागेल, पुरावे बघावे लागतील. घटनात्मक बाबींचा विचार करुन योग्य निर्णय घेऊ, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

यानंतर अपात्रतेबाबत सुनावणी होईल

सर्वात आगोदर कोणता गट पॉलिटिकल पार्टीचं प्रतिनिधीत्व करतो याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय घेण्यासाठी योग्य तपास करावा लागेल. पक्षाची घटना काय म्हणते हे देखील विचारात घ्यावं लागेल. तो विषय पहिले हाताळावा लागेल, त्यानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावण्या घ्याव्या लागतील. नेमका किती वेळ लागेल हे आता सांगू शकत नाही. मात्र, लवकरात लवकर सुनावणी संपवण्याचा प्रयत्न करु, असेही नार्वेकरांनी स्पष्ट केलं.

गोगावलेंना आम्ही नियुक्त केलं नाही

व्हिप हा एकच असू शकतो, दोन असू शकत नाहीत. राजकीय पक्षाचा व्हिप लागू होणार,
त्यामुळे पक्ष कोण हे ठरवावं लागेल. विधानसभा अध्यक्षांनी कोणत्या व्हीपला मान्यता द्यावी,
हे सुप्रीम कोर्टाने सांगितले नाही. भरत गोगावलेंना आम्ही नियुक्त केलेलं नाही.
गोगावलेंना नियुक्त केल्याचं पत्र आम्हाला दिलं, त्याची नोंद आम्ही घेतली.
अमुक व्यक्तीची निवड योग्य, दुसऱ्याची अयोग्य, असं कोर्ट म्हणाले नाही, असा दावा नार्वेकर यांनी केला.

Web Title :- Maharashtra Political Crisis | vidhansabha speaker to decide faith of 16 mlas rahul narvekar tells procedure

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cyber Police Crime News | पुणे सायबर पोलिस क्राईम न्यूज : विमा पॉलिसीच्या बहाण्याने 2 कोटींचा गंडा घालणार्‍याला दिल्लीतून अटक

Congress Mohan Joshi On Shinde Fadnavis Govt | बेकायदेशीर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा – मोहन जोशी

Maharashtra Political Crisis | भरत गोगावलेंची प्रतोतपदी पुन्हा नियुक्ती होणार?, शिंदे गटाचे खासदार म्हणाले…