Maharashtra Political Crisis | विधानभवनात बहुमत चाचणी घेतली तर काय? SC ने शिवसेनेला सांगितले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष आता सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) पोहोचला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Shivsena Rebel Leader Eknath Shinde) यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांवर कारवाई करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने थोडा वेळ दिला आहे. सर्व आमदारांना पुढील पाच दिवसांमध्ये आपले प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करावे लागणार आहे. त्यामुळे 12 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई (Maharashtra Political Crisis) करता येणार नाही, असा दिलासा शिंदे गटाला मिळाला आहे. असे असताना विधिमंडळात अविश्वास ठराव मांडला तर काय, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला. यावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.

 

आजचा निकाल शिंदे गटासाठी (Eknath Shinde Group) मोठा दिलासा देणारा आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी (Assembly Vice President) आज सायंकाळपर्यंतची मुदत या आमदारांना दिली होती अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात (Maharashtra Political Crisis) येणार होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे हे अपात्र आणखी काही दिवस गुवाहाटीलाच थांबण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे वकील देवदत्त कामत (Lawyer Devdutt Kamat)
यानी या काळात फ्लोअर टेस्ट (Floor Test) घेतली गेली तर काय करायचे असा सवाल सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला.
कारण हे बंडखोर आमदार अपात्र असणार नाहीत, यामुळे ते मतदान करु शकतात, अशावेळी सरकारला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
यावर न्यायालयाने म्हटले की, जर तरच्या गोष्टीवर आम्ही आदेश देऊ शकत नाही.
परंतु जर कोणीही फ्लोअर टेस्टची मागणी केली, आणि जर एखादा पक्ष आमच्याकडे दाद मागण्यासाठी आला
तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे पूर्णपणे उघडे आहेत, आम्ही त्याची तात्काळ दखल घेऊ, असे सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | what if a flore test is taken in the vidhan bhavan supreme court has clearly told the shiv sena in eknath shinde mlas case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Scheme | रोज 50 रुपये जमा करून एकदाच मिळवा 35 लाख, स्कीमबाबत जाणून घ्या सविस्तर

 

Deepak Kesarkar On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना मतदान देऊन चूक झाली, त्यांनी राजीनामा द्यावा’ – दीपक केसरकर

 

Pune Crime | माल खरेदी करुन पैसे एटीएममधून काढून देण्याचा बहाणा करुन पळून जाणाऱ्या चोरट्याला पकडले