मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ (Maharashtra Politics) झाल्यानंतर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले. यानंतर शिवसेनेत (Shiv Sena) शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) निर्माण झाले. दोन्ही गटांनी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर (Dhanushyaban Symbol) दावा केला. अखेर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे (Election Commission) गेले. मागील सुनावणीच्यावेळी दोन्ही गटांच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद करत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगासमोरील युक्तीवाद अंतिम टप्प्यात आला असला तरी मूळ शिवसेना कुणाची व धनुष्यबाण (Maharashtra Political Crisis) कोणाला द्यायचा? याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. यावर सोमवारी (दि.30) सुनावणी होणार आहे. या सुनावणीत निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांनी स्वत: शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) एका जाहीर सभेत सांगितले होतं,
की आता माझ्यानंतर या शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पूर्ण सांभाळतील.
तुम्ही त्यांना साथ द्या, सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे रहा आणि युवा म्हणून ती जबाबदारी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) घेतील,
असं बाळासाहेबांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याची नोंद शिवसैनिकांनी घ्यावी, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Political Crisis)
दरम्यान, निवडणूक आयोगात झालेल्या मागील सुनावणीत शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? याबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
निवडणूक आयोगाने 23 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश शिंदे गट आणि ठाकरे गटाला दिले आहे.
लेखी उत्तर मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Title :- Maharashtra Political Crisis | whose name of shiv sena and bow and arrow symbol symbol ajit pawar reaction on tomorrows hearing before the election commission
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Supriya Sule | ‘वंचित’ सोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या…