Maharashtra Political Crisis | आमदारांना तातडीचे आदेश ! कोणत्याही क्षणी मुंबईत यावे लागेल, संपर्कात रहा – भाजप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena Leader Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी (Maharashtra Political Crisis) घडत आहेत. शिंदे यांना शिवसेनेने गटनेते (Group Leader) पदावरून हटवल्यानंतर त्यांनी वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) कोरोनामुळे दवाखान्यात अ‍ॅडमिट असूनही सर्व हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे दिसते. कारण सर्व सूत्रे अजूनही त्यांच्याच हातात आहेत.

 

शिवाय, भाजपाने (BJP) देखील राज्यातील आपल्या सर्व आमदारांना अलर्ट केले आहे. कोणत्याही क्षणी मुंबईत दाखल व्हावे लागेल, असे आदेश भाजपाने आमदारांना (BJP MLA) दिले आहेत. या सर्व राजकीय हालचाली पाहता महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi Government) काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.(Maharashtra Political Crisis)

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कोणत्याही क्षणी राजीनामा (Resignation) देऊ शकतात, असे वृत्त असतानाच दुसरीकडे भाजपाने आपल्या आमदारांना कुठल्याही दौर्‍यावर न जाता, संपर्कात रहावे, कोणत्याही क्षणी मुंबईत (Mumbai) यावे लागेल, असे आदेश दिले आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील दिल्लीहून मुंबईत आले आहेत. सागर बंगल्यावर आता बैठकांचे सत्र सुरु झाले असून आमदारांना वरील तातडीचे आदेश पाठविले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्याकडे 35 नव्हे तर 40 आमदार असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय आणखी 10 आमदार येत असल्याची माहिती बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली आहे. हे सर्व संख्याबळ पाहता अनेक राजकीय नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा असे म्हटले आहे.

 

गुवाहाटीत पोहचलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांची येथील रॅडिसन हॉटेलमध्ये (Radisson Hotel Guwahati) बैठक सुरू आहे.
या बैठकीत गटनेता ठरवला जाऊ शकतो. तत्पूर्वी आपल्या सोबत 40 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता.
गटनेते पदाचा दावा करण्यासाठी शिंदे गोव्याला जाण्याची शक्यता होती.
यानंतर शिंदे राज्यपालांना भेटायला जाऊ शकतात. दरम्यान भाजप सुद्धा सत्ता स्थापनेचा दावा यानंतर करू शकतो.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | you have to come to mumbai at any moment stay in touch bjps urgent orders to mlas across the state after eknath shinde revolt shivsena maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांनी गृहखात्याला झापलं? म्हणाले – ‘एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही

 

Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार ?, शिवसेना नेते संजय राऊत यांचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

 

Sharad Pawar And Eknath Shinde | शरद पवार यांच्या नंतरचे राज्यातील सर्वात मोठे बंड; पवार यशस्वी ठरले, एकनाथ शिंदे यशस्वी होतील का?

 

Udayanraje Bhosale | राजकीय घडामोडींवर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच’