Maharashtra Political | पश्चिम महाराष्ट्रात भाजप मेगाभरतीच्या तयारीत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political | राज्यात ठाकरे सरकार (Thackeray Government) जाऊन शिंदे – फडणवीस सरकार (Shinde – BJP Government) आल्यानंतर राजकीय समिकरणांची नव्याने मांडणी होऊ लागली आहे. याचाच एक भाग म्हणून आता राज्यातील बदलत्या राजकीय वाऱ्याची दिशा ओळखून आपली भूमिका लवचिक ठेवणारे राजकीय नेते (Maharashtra Political) सावध झाले आहेत. याशिवाय, आघाडी सरकारमध्ये नाराज असलेल्या नेत्यांनाही आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) राज्यात पुन्हा मेगा भरतीचा कार्यक्रम (Mega Recruitment Programme) राबवला जाऊ शकतो. विधानसभा (Assembly) आणि लोकसभा निवडणुकांना (Lok Sabha Election) दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. या काळात भाजपकडून 2019 प्रमाणे वेगवेगळ्या पक्षातून नेत्यांची ‘आयात’ करण्याच्या मोहिमेला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.

 

राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. असे असले तरी 16 आमदारांच्या (MLA) अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने या सरकारचे भवितव्य अनिश्चित आहे. त्यामुळे भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या राजकारण्यांनी (Maharashtra Political) सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. परंतु सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ सुरु होईल अशी चर्चा आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस (Congress) – राष्ट्रवादीचे (NCP) स्थानिक नेते, माजी आमदार – पदाधिकाऱ्यांसोबत भाजप प्रवेशाबाबत बोलणी सुरु झाली आहे. याला पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातील (Marathwada) अनेक नेतेही भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Former Mohol MLA Rajan Patil) हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती.

 

याशिवाय माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे (Madha MLA Babandada Shinde) हे देखील भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
आमदार शिंदे आणि त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे (Ranjit Singh Shinde) यांचे खासगी आणि सहकारी साखर कारखानदारीचे मोठे जाळे आहे.
त्यामुळे राजन पाटील आणि बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला मोठा धक्का बसू शकतो.
तसेच आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं.

 

तर काँग्रेसचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) हे 2019 पासूनच भाजपच्या संपर्कात असून ते भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक आहेत.
शिंदे – फडणवीस सरकार राज्यात स्थिर झाल्यानंतर भाजपच्या मेगा भरतीची मोहिम आणखी वेग घेण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागातून देखील काँग्रेस – राष्ट्रवादीचे नाराज नेते, पदाधिकारी भाजपचे कमळ हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Web Title :- Maharashtra Political | mega recruitment in bjp after power shift in maharashtra politics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा