Maharashtra Political News | अजित पवारांकडे अर्थखाते, पण निर्णय…, शिवसेनेची सावध भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खातेवाटपावरून पेच निर्माण झाला होता. अखेर आज खातेवाटप करण्यात आले. शिंदे गटाने (Shinde Group) मविआमधून बाहेर पडताना अजित पवार (Ajit Pawar) निधी देत नसल्याचा आरोप केला होता. त्यातच अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्याकडे अर्थखात्याची (Finance Minister) जबाबदारी देण्यात आली. मात्र याला शिवसेनेचा (Shivsena) विरोध होता. (Maharashtra Political News) यामुळे अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अर्थ खात्यासह महत्त्वाची खाती आपल्याकडे घेतली. मात्र, यामध्ये एक समझोता झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी त्यांना निर्णय घेण्याचे तेवढे स्वातंत्र्य नसणार आहे. (Maharashtra Political News) अजित पवारांनी घेतलेले निर्णय आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे जातील आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे जातील. त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल. यामुळे यापुढे होणारे मतभेद टाळता येतील, असा प्रयत्न शिंदे-फडणवीसांचा आहे.

 

याबाबतचे संकेत मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले आहेत.
अजित पवारांनी काहीही निर्णय घेतला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे,
असे केसरकर यांनी सांगितले. अजित पवारांनी जी अडचण होती ती समजून घेतली,
यामुळे ते जो निर्णय घेतील तो सर्वांसाठी चांगला असेल, असेही दीपक केसरकर म्हणाले.

दरम्यान आज जाहीर झालेल्या खातेवाटपात भाजपच्या (BJP) मंत्र्यांकडे असणारी सहा आणि शिवसेना शिंदे गटाकडे असलेली तीन खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटातील मंत्र्यांना मिळाली आहेत. खातेवाटप करताना काही मंत्र्यांना नारळ मिळणार अशी चर्चा होती. मात्र, या मंत्र्यांना अभय मिळाल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडील खाती काढून घेतली असली तरी त्यांना इतर खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

 

Web Title : Maharashtra Political News | ajit pawar has finance ministry but there descisions will go to
eknath shinde via fadnavis a hint of kesarkar too

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा