Maharashtra Political News | … तर राजकारणात सक्रिय व्हायला तयार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचे राजकारणात येण्याचे संकेत

बारामती/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर त्यांची दोन मुलं पार्थ पवार (Parth Pawar) आणि जय पवार (Jay Pawar) हे अॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पार्थ पवार हे राजकारणात (Maharashtra Political News) सक्रिय होतेच मात्र आता त्यांच्या नंतर त्यांचे धाकटे बंधू जय पवार हे देखील राजकारणात येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच जय पवार यांनी राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी बारामतीच्या राष्ट्रवादी कार्यालयात ( Baramati NCP Office) पहिल्यांदाच उपस्थिती लावली. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना सल्ले दिले. जयदादा तुम्ही आता बारामतीत अॅक्टिव्ह व्हायला हवे, आपल्याला अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे तुम्ही आता बारामतीत यायला पाहिजे, असा प्रेमळ सल्ला कार्यकर्त्यांनी जय पवार यांना दिला. (Maharashtra Political News)

बारामतीमध्ये सक्रीय होण्याची कार्यकर्त्यांची मागणी ऐकून जय पवार यांनीही उत्तर दिलं. तुम्ही यासंदर्भात अजितदादांना विचारा, त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की मी लगेच कामाला लागतो, असे जय पवार म्हणाले. कार्यकर्त्यांनी आता थेट अजित पवार यांच्याकडे जय पवार यांना बारामतीच्या राजकारणात पार्थ पवार यांच्या सोबत सक्रिय करावे, अशी मागणी करण्याचा निश्चय केला आहे.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या मिरवणुकीत पार्थ पवार हे त्यांच्या सोबत होते.
तर मुंबईतील मेळाव्या दरम्यान अजित पवारांच्या पाठिमागे जय पवार हे देखील त्यांच्या भाषणाच्या वेळी पूर्ण वेळ
थांबून होते. काही दिवसांपूर्वी पुण्यात बालेवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
आयोजित करण्यात आलेल्या सतेज करंडक (Satej Cup) आणि पुणे लीग कबड्डी स्पर्धा 2023 चं
(Pune League Kabaddi Tournament 2023) उद्घाटन पार्थ पवार आणि जय पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.
वडील सत्तेत सहभागी झाल्यानंतर पार्थ पवार आणि जय पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | रक्षाबंधन :पुण्याच्या पोलीस उपायुक्तांनी साधला बालगोपाळांशी संवाद