Maharashtra Political News | राज ठाकरेंना भाजपची ऑफर? दीपक केसरकर म्हणाले – ‘त्यांच्या ताकदीचा वापर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | मुंबईच्या वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये (MIG Club Bandra) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बैठक आज (दि.14) पार पडली. या बैठकीला पक्षाचे नेते, सरचिटणीस आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसेला भाजपकडून (BJP) महायुतीत येण्याची ऑफर आहे, असं वक्तव्य केल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी (Maharashtra Political News) प्रसारित केल्या होत्या. यावर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde Group) प्रतिक्रिया आली आहे. शालेय शिक्षण मंत्री (School Education Minister) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, राज ठाकरे आमच्याबरोबर असावेत अशीच आमची इच्छा आहे. मुंबईच्या हिताचा विषय येईल तेव्हा ते आमच्या सोबत असतील.

दीपक केसरकर म्हणाले, जेव्हा नवे बदल होत असतात तेव्हा काही अडथळे निर्माण होतात. परंतु हे अडथळे कायमस्वरुपी आहेत असं मला वाटत नाही. राज ठाकरे यांचं मुंबईवर खूप प्रेम आहे. मुंबईचं हित होतंय हे दिसेल त्यावेळी राज ठाकरे आमच्यासोबत असतील असंच मला वाटतंय. (Maharashtra Political News) अर्थात ते आमच्याबरोबर असावेत असं मला वाटतं. मात्र, हा निर्णय अर्थातच वरिष्ठांना घ्यायचा आहे. हा निर्णय भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM (Eknath Shinde) यांनी घ्यायचा आहे.

दिपक केसरकर पुढे म्हणाले, राज ठाकरे यांचे विचार मराठी माणसांच्या हिताचे असतात.
त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लाखो लोक उपस्थित असतात. ही त्यांची ताकद आहे.
त्यांच्या याच ताकदीचा वापर महाराष्ट्राच्या तसेच मुंबईच्या हितासाठी व्हायला हवा.
त्यामुळे अडथळे दूर होतील आणि राज ठाकरे नक्कीच चांगला निर्णय घेतील, असं मला वाटतं.

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना थेट सांगितले की, भाजपकडून आपल्याला ऑफर आहे. परंतु मी त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही.
एकनाथ शिंदे आणि नुकतेच युतीत सामील झालेले अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाजप काय करणार,
पुढचे गणित कसं जुळवणार याची स्पष्टता नाही. त्यामुळे मी अजून निर्णय घेतला नाही.
युतीबाबत तुम्ही चर्चा करु नका. सध्या पक्ष वाढवणे हे महत्त्वाचे असल्याचे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

President’s Medal | महाराष्ट्रातील 8 अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ तर 5 कर्मचाऱ्यांना ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर