Maharashtra political News | मुंबई, कोकणमध्ये वर्चस्व असलेल्या शिवसेनेला शह देण्याची भाजपची रणनीती

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Maharashtra political News |मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार (modi cabinet expansion) झाला आहे. नारायण राणे आणि कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई, कोकणमध्ये वर्चस्व असलेल्या शिवसेनेला शह देण्याची भाजपची रणनीती असल्याचे स्पष्ट झाले आहे. Maharashtra political News | bjps next target mumbai konkan and shiv sena

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update 

मुंबईत सुरु झालेली राणेंची राजकीय कारकीर्द आणि कोकणातील राजकारणावरही त्यांचा प्रभाव आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेनेवर थेट हल्लबोल करणारे नेते म्हणून राणेंना ओळखले जाते.
राणेंचा भाजप (BJP) प्रवेश आणि नंतर राज्यसभेची खासदारकी मिळण्यात विलंब होण्याचे कारण म्हणजे शिवसनेने केलेला विरोध.
शिवसेना विरोधकांस संधी दिली गेल्यामुळे भाजप आणि शिवसेना (shivsena) यांच्यातील संबंध आणखी दुरावण्याची शक्यता आहे.
काही दिवसापासून भाजप शिवसेना एकत्र येणार अशी चर्चा होती परंतु मंगळवारी संपलेले विधिमंडळ अधिवेशन (Legislative Assembly) आणि बुधवारी राणेंचा मंत्रिमंडळात झालेला समावेश पाहता दोन्ही पक्षांमधील कटुता वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे आणि परिसरातील महापालिकांच्या निवडणुका यावर्षी आणि पुढील वर्षीच्या सुरुवातीला होत आहेत.
या निवडणुकांमध्ये संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे.
मुंबई आणि कोकणात राणे तर ठाणे, भिवंडी, पालघर पट्ट्यात कपिल पाटील यांचा प्रभाव आहे.
त्यामुळे या भागातील शिवसेनेचा वारू रोखण्यासाठी या दोघाना संधी दिल्याची भाजपची रणनिती दिसते. मुंबई परिसरात आगरी समाजाची मोठी संख्या आहे.
त्यामुळे भाजपने या समाजाच्या व्होटबँकेवर लक्ष केंद्रित केलेले दिसते.
तर दुसरीकडे प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना मंत्री न करता डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने वंजारी चेहरा दिला गेला; हा मुंडे परिवारासाठी धक्का मानला जातो.

मूळचे भाजपजन असलेले प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) आणि संजय धोत्रे यांना वगळले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांचे धोत्रे हे समर्थक मानले जातात. नारायण राणे, कपिल पाटील व भारती पवार हे मूळ भाजपजन नाहीत.
राणे यांचा प्रवास शिवसेना-काँग्रेस-भाजप असा राहिला, तर पाटील व पवार पूर्वी राष्ट्रवादीत होते.
त्यामुळे आजवर भेरूल आलेल्याना संधी दिली जात नाही अशी जी काही चर्चा होती.
त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. जावडेकर यांना वगळणे सर्वांत धक्कादायक ठरले.
तर रावसाहेब दानवे यांनी स्वत:चे स्थान टिकवले. धोत्रे यांना वगळल्याने विदर्भाचा टक्का कमी झाला असे मानले जात असले तर महाराष्ट्राचा टक्का वाढला आहे.
कारण पूर्वी महाराष्ट्राचे तीन कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री होते.
आता तीन कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्री असतील.
नव्याने समाविष्ट झालेले मंत्रिमंडळातील चारही चेहरे बघता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरली असे दिसते.

काही दिवसापूर्वीच स्वत: फडणवीस यांनी ते केंद्रात जाणार नाहीत, असे स्पष्ट केले होते.
पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी मंत्रिमंडळात महाराष्ट्राला प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात काही निवडक नेत्यांशी चर्चा केली होती. त्यामध्ये फडणवीस प्रामुख्याने होते.

Web Title : Maharashtra political News| bjps next target mumbai konkan and shiv sena

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता भाजप संघटनेतही होणार बदल; प्रकाश जावडेकर, ‘या’ दिग्गजांना मिळणार महत्त्वाची जबाबदारी

Pune Police News | पोलिसांच्या धडक कारवाईने ‘व्हॉईट क्रिमिनल’ हादरले; बांधांवर जाऊन केले 100 % पैसे परत, पुणे जिल्ह्यातील घटना

LTC Cash Voucher Scheme | 50 लाखापेक्षा जास्त केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फायद्याची गोष्ट, LTC Bill बाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय