Maharashtra Political News | छगन भुजबळ शरद पवारांना जेलमधून ब्लॅकमेल करायचे, माजी आमदार रमेश कदमांचा खळबळजनक गौप्यस्फोट

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असताना राष्ट्रवादीचे (NCP) नेते (अजित पवार गट – Ajit Pawar Group) आणि राज्याचे विद्यमान मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना जेलमधून ब्लॅकमेल (Blackmailing) करत होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी आमदार रमेश कदम (Former MLA Ramesh Kadam) यांनी केला आहे. रमेश कदम यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात (Annabhau Sathe Financial Development Corporation) 312 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption) केल्याप्रकरणी रामदास कदम आठ वर्षे अटकेत होते. (Maharashtra Political News)

गुरुवारी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर रमेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना हा खळबळजनक दावा केला आहे. रमेश कदम म्हणाले, छगन भुजबळ शरद पवार यांना जेलमधून ब्लॅकमेल करायचे. जामिनासाठी भुजबळांची धडपड सुरू होती. आपला जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देत भुजबळ त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा दावा कदम यांनी केला आहे. छगन भुजबळ तुरुंगात असताना त्यांच्याशी भेट होत होती. त्यावेळी भुजबळ हे पवार साहेबांना मला मदत केली पाहिजे. जामिनाला खूपच उशीर होत आहे असं म्हणत नाराजी बोलून दाखवायचे असेही रमेश कदम यांनी म्हटले. (Maharashtra Political News)

सत्तेत असणारे भुजबळ आणि जेलमध्ये असणारे भुजबळ यामध्ये खूप फरक आहे. जेलमध्ये ते रोज आजारी पडायचे.
काकूळतीला येत होते. त्यांना रोज उपचाराची गरज होती. जेलमधून बाहेर आल्यापासून आम्ही बातमी ऐकली नाही
भुजबळ यांच्या छातीत दुखतंय, असं म्हणत रमेश कदम यांनी टोला लगवाला. जेलमध्ये गेलं की लोक आजारी पडतात.
त्यांना माहिती आहे की सहानुभूती मिळवून कसा जामीन मिळवायचा. परंतु जेल ही कोणाच्या नशिबाला येऊ नये नरक आहे,
असे रमेश कदम यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Heart disease : रोज प्यायलात इतकी दारू तर हृदय रोगापासून होईल बचाव, कोलेस्ट्रॉल सुद्धा नाही वाढणार