Maharashtra Political News | ‘मविआची ‘वज्रमूठ’ तडा गेलेली’, देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वाशिममधील सभेत बोलताना, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नागपूर येथे होणाऱ्या ‘वज्रमूठ’ सभेवरुन (Maharashtra Political News) खोचक टीका केली होती. मविआची ‘वज्रमूठ’ तडा गेलेली आहे, असे फडणवीस म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला ठाकरे गटाने (Thackeray Group) प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) म्हणाले, संभाजीनगरमध्ये झालेली दंगल ही केवळ महाविकास आघाडी एकत्र येऊ नये म्हणून घडविण्यात आली होती. आता नागपूरमध्ये आमची ‘वज्रमूठ’ सभा होणार आहे. त्याला भाजपाकडून विरोध होतो आहे. ही सभा होऊ नये यासाठी प्रयत्न (Maharashtra Political News) केले जात आहेत. त्यामुळे नेमक्या भेगा कोणाला पडल्या आहेत हे दिसतेय. तसेच भाजपाने (BJP) ‘वज्रमूठ’ सभेचा धसका घेतला असून याच वज्रमूठीमुळे त्यांची दातखिळी बसेल अशी टीका सावंत यांनी केली. ते अमरावतीत बोलत होते.

आदित्य ठाकरेंनी दिलं प्रत्युत्तर

फडणवीस यांच्या टीकेला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
महाविकास आघाडीच्या वज्रमूठेला कुठेही भेगा पडलेल्या नाहीत. त्यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देऊ नये.
देशातील लोकशाही आणि संविधान (Constitution) टिकावं, हाच आमचा उद्देश आहे आणि त्यासाठी आमचा लढा
सुरु आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

भाजपची ‘वज्रमूठ’ ही विकासाची ‘वज्रमूठ’ आहे. तर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ ही तडा गेलेली आहे.
महाविकास आघाडीचे तीन तोंड तीन वेगळ्या दिशेला आहेत. त्यांचा एक भोंगा सकाळी नऊ वाजता वाजतो.
दुसरा भोंगा त्याच्या विरुद्ध दुपारी बारा वाजता वाजतो. तर तिसरा भोंगा संध्याकाळी वेगळंच काहीतरी बोलतो.
त्यामुळे हे लोक राज्यातील जनतेसाठी काहीही करु शकत नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

Web Title :-  Maharashtra Political News | devendra fadnavis criticized mva vajramuth rally in nagpur aditya thackeray replied to criticism

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Devendra Fadnavis | डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Political News | ‘फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा…’ काँग्रेसचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र