Maharashtra Political News | नवाब मलिकांना भाजपकडून ऑफर?, एकनाथ खडसेंचे मोठं विधान; म्हणाले – ‘मलिक भाजपमध्ये गेले तर…’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Former Minister Nawab Malik) यांना अखेर न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांचा जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. मलिक यांना दोन महिन्यांसाठी हा जामीन दिला आहे. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं कथित प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) मलीक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी अटक (Arrest) केली होती. (Maharashtra Political News) मात्र, किडनी संबंधित असलेल्या दुर्धर आजाराने मलिक यांना ग्रासले आहे. त्यावर उपचार करण्यासाठी जामीन मिळावा अशी मागणी ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केली होती. यावर ईडीकडून (ED) महाधिवक्ता तुषार मेहता (Tushar Mehta) यांनी विरोध दर्शवला नाही.

नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून (Maharashtra Political News) प्रतिक्रिया येत आहेत. मलिक जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात (Ajit Pawar Group) जाणार किंवा भाजपमध्ये (BJP) जातील, अशी चर्चा सुरु झाली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठं विधान केलं आहे.

पवारांचे मलिकांवर खूप उपकार आहेत

एकनाथ खडसे म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) यांचे नवाब मलिक यांच्यावर खूप उपकार आहेत, पवार यांनीच त्यांना राजकारणात अनेक संधी दिल्या आहेत. मलिक यांनी खूप उत्तम काम केलं आहे. त्यामुळे मला वाटतं की मलिक हे शरद पवार यांच्यासोबत राहतील. एकनाथ खडसे जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपमध्ये गेले तर…

मलिक यांना भाजपकडून ऑफर आल्याची चर्चा सुरु आहे. यावर खडसे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले,
ही गोष्ट येणारा काळच सांगू शकेल. यात एक गोष्ट मात्र नक्की आहे की मलिक हे जर भाजपमध्ये गेले तर तिथे
जाऊन स्वच्छ होऊन ते बाहेर येतील. त्यामुळे एखाद्या वेळेस भाजपा त्यांना ऑफर देऊ शकते.
कारण भाजपकडे लोकांना स्वच्छ करण्याची मशीन आहे.

मग भाजप नेते त्या माणसाचं…

भाजपकडे वॉशिंग मशीन पेक्षा भारी मशीन आहे. त्या मशिनमध्ये जर माणूस घातला तर तो स्वच्छ होतो.
तो माणूस कितीही घाणेरडा असला, भ्रष्ट असला तरी तो त्यात घातला की स्वच्छ होतो, प्रामाणिक होतो.
मग भाजप नेते त्या माणसाचं, त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करतात, त्याला मंत्रिमंडळात स्थान देतात,
असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI Debit Card | डेबिट कार्डधारक असाल तर तुम्हांला बॅंकेचे ‘हे’ नियम माहिती असणे गरजेचे