Maharashtra Political News | प्रकृती बिघडल्यानंतर हर्षवर्धन जाधवांनी जाहीर केला राजकीय वारसदार, आगामी निवडणुकीत नेतृत्व कोणाचं?

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | मनसे भरात असताना त्यांनी लढविलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे १३ आमदार निवडून आले होते. त्यातील एक आमदार म्हणजे औरंगाबादच्या (Aurangabad News) कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav). त्यानंतर पक्षांतर्गत वादामुळं मनसेला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, तिथेही त्यांचं जुळलं नाही आणि त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर त्यांनी स्वत:चा शिवस्वराज्य बहुजन पक्ष काढला. मागील लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. मात्र, निवडणुकीत पराभव झाला. (Maharashtra Political News)

आता त्यांनी त्यांच्या मुलाला स्वतःचा राजकीय वारसदार घोषित केले आहे. फेसबुकवर एक व्हिडिओ टाकत त्यांनी आगामी सर्व निवडणूक आदित्य यांच्या नेतृत्वात लढवण्याची घोषणा केली. हर्षवर्धन जाधव यांची तब्येत ठीक नसल्याने ते काही काळ विश्रांती घेणार आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी यासंबंधी घोषणा केली, ‘मला आता राजकारणात काही नको, पण तुम्हाला हवा असणारा आमदार माझा मुलगा आदित्यच्या रूपाने जाधव कुटुंब तुम्हाला २०२९ मध्ये देईल.’ (Maharashtra Political News)

ते म्हणतात, ‘कन्नडच्या नागरिकांना माहिती आहे, माझी तब्येत थोडीशी नादुरुस्त आहे, साखर वाढलेली आहे, मध्यंतरीच्या काळात ऑपरेशन करण्याचं ठरवलं होतं, पण माझ्या मुलाने सांगितलं की पप्पा तुम्ही थोडं थांबा, आपण कंट्रोल होतंय का पाहूया, पण दुर्दैवाने कंट्रोल झालं नाही, म्हणून एक ते दीड महिन्याचा आराम मला सांगितला आहे, त्यामुळे दरम्यानच्या काळात मी सेवेत उपलब्ध नसेन.’

त्यांनी सांगितले, ‘आगामी सर्व निवडणुका – नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या
या आदित्यच्या नेतृत्वाखाली रायबान जाधव विकास आघाडी लढेल, असं मी घोषित करतो.
मार्केट कमिटी आम्ही लढणार नाही कारण तिथले मतदार सोसायटी आणि ग्रामपंचायतीचे डायरेक्टर असतात
आणि ते कसं मतदान करतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत आणि आम्ही ते लढू शकत नाही, नगराध्यक्ष पद आणि झेडपी,
पंचायत समिती नक्कीच लढू, नगरपालिका जर ताब्यात दिली, तर निश्चितच करमुक्त नगरपालिका मिळवून देईन,
तसंच झेडपी, पंचायत समिती ताब्यात दिलीत, तर दरवर्षीप्रमाणे नुकसानभरपाई मिळवून देऊ,
त्याचप्रमाणे पीक विमा असेल, वीज मंडळाचे प्रश्न, विहिरी, गोठे यांसारख्या गोष्टी सोडवू,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.

Web Title :- Maharashtra Political News | former mla harshvardhan jadhav son aditya to lead party in elections maharashtra political news aurangabad news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SPPU News | पुणे विद्यापीठात भोजनासाठी विद्यार्थ्यांना जादा पैसे मोजावे लागणार

Pune Rural Police | शौर्यदिनानिमित्ताने पुणे ग्रामीण पोलिसांना ‘हे’ अधिकार प्राप्त

MNS On Brijbhushan Singh | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे ब्रिजभूषण सिंह येणार पुण्यात; मनसेची भूमिका मात्र…