Maharashtra Political News | ‘2024 ची कशाला वाट बघू… मी आताच दावा करतो’, अजित पवारांचं सूचक विधान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहेत. अजित पवार भाजपसोबत (BJP) जाणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, त्याला अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करत पूर्णविराम दिला. मात्र, शुक्रवारी एका वृत्त समुहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक सूचक विधान करून भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना बळ दिलं आहे. (Maharashtra Political News)

 

अजित पवार यांनी दोन मुख्यमंत्र्यांसोबत (Chief Minister) उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. आता 2024 ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही दावा करणार का, असे विचारले असता अजित पवार म्हणाले, 2024 लाच का? आताच करणार, 2024 ची कशाला वाट बघू, असं म्हणून त्यांनी सूचक विधान केलं. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Political News) भूकंप अटळ असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

अजित पवार म्हणाले, मी आता देखील राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. मी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं. दोघांनाही आमदारकी पदाचा अजिबात अनुभव नव्हता. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आनंदाने काम केलं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत आमच्या पक्षातील वरिष्ठांनी सांगितलं म्हणून काम केलं, असंही पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार यांना 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती.
त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, 2004 मध्ये काँग्रेसपेक्षा (Congress) आमच्या जागा जास्त होत्या.
त्यावेळी आम्हाला संधी होती. तेव्हा आम्ही आर.आर. पाटलांना (RR Patil) विधीमंडळ नेता म्हणून निवडले होते.
त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री आर.आर. पाटील झाले असते. मात्र हे दिल्लीतून ठरलं होतं, असं त्यांनी सांगितले.

 

माझा आजचा कार्य़क्रम पूर्वनियोजितच होता. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) सुद्धा तिथे आहेत.
पण हा कार्यक्रम अडीच महिन्यापूर्वीच ठरला होता. त्यामुळे मी इथं आलो आहे.
त्यामुळे मी मुंबईत पक्षाच्या शिबिराला हजर राहू शकलो नाही.
मात्र मीडियातून उगीच संभ्रम निर्माण केला जात आहे.
मला या कार्यक्रमामुळे मुंबईत जाता आलं नाही, असा खुलासा अजित पवार यांनी केला.

 

Web Title :- Maharashtra Political News | i am ready to accept the responsibility of the chief minister of the state say ncp leader ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | अत्याधुनिक तंत्रज्ञानातून पारदर्शक आणि गतिमान सेवा पुरवाव्यात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune RTO News | उबेरसह चार कंपन्यांना तीनचाकी ऑटोरिक्षा ‘ॲग्रीगेटर लायसन्स’ नाकारले

Chandrashekhar Bawankule | ‘महाविकास आघाडीतील नेतेच अजितदादांना जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत’ – चंद्रशेखर बावनकुळे (व्हिडिओ)