Maharashtra Political News | ‘कोणतंही लग्न व्हायचं असेल तर..’, अजित पवारांच्या सरकारसोबत जाण्यासंदर्भात गुलाबराव पाटलांचे सूचक विधान

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपसोबत सरकारमध्ये (BJP Government) जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मध्यंतरी अजित पवार नॉट रिचेबल असल्याची अफवा पसरली होती. परंतु त्यानंतर स्वत: अजित पवार यांनी यावर खुलासा (Maharashtra Political News) करुन चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र, आता पुन्हा एकदा अजित पवार मविआतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु झाली असून त्यावर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सूचक विधान केलं आहे. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार हे युतीत येणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. दरम्यान, अजित पवारांसोबत बरेच आमदार असून कोणतेही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते. मात्र त्यासाठी अजून कुळ बघावं लागले. गुण जुळवावे लागतील. नंतरच ते काम करावं लागेल असे वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. (Gulabrao Patil On Ajit Pawar)

 

सध्या अजित पवार राष्ट्रवादीचेच
यावेळी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे (Maharashtra Political News) किती आमदार असतील? असा प्रश्न गुलाबराव पाटील यांना विचारला. यावर उत्तर देताना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं सांगितले. सध्या अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. ते म्हणतील तो आकडा बनेल, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

अजित पवारांबाबत नेत्यांचे दावे-प्रतिदावे
अजित पवार सरकारमध्ये सामिल होणार असल्याच्या चर्चांमध्ये राजकीय नेतेमंडळी वेगवेगळे दावे करुन या चर्चांना खतपाणी घालताना दिसत आहेत. रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी तर अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊ केली आहे. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाकाडून वेगवेगळे दावे केले जात असताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) मात्र, अजित पवार प्रमुख नेते आहेत, ते असे पाऊल उचलणार नाहीत, असे विधान केले आहे. याच पार्श्वभूमीवर गुलाबवराव पाटील यांनी सूचक विधान केले आहे.

 

Advt.

Web Title :- Maharashtra Political News | maharashtra minister gulabrao patil comment on ncp leader ajit pawar in jalgaon bjp govt

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chandrakant Patil | मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरणावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत पाटील

Unseasonal Rains In Pune | अलर्ट ! आगामी 2 दिवस पावसाचे, पुणेकरांनी घ्यावी काळजी