Maharashtra Political News | ‘दगड मारुन सभा उधळणारी आम्ही लोकं…’ गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याचा पलटवार, म्हणाले – ‘तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रविवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. आर.ओ. पाटील (R.O. Patil) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार (Maharashtra Political News) आहेत. मात्र, या सभेपूर्वीच संजय राऊत (Sanjay Raut) आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोक आहोत, त्यामुळे आम्हाला चॅलेंज देऊ नका, असा इशारा पाटील यांनी संजय राऊतांना दिला आहे. यावर माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटलांवर पलटवार केला आहे.

 

काय म्हणाले गुलाबराव पाटील?
संजय राऊत कोणत्याच आंदोलनात नव्हते. शिवसेनेचं कसं करावं हे त्यांना माहिती नाही. आम्ही दगडं मारुन लोकांच्या सभा उधळून लावणारी लोकं (Maharashtra Political News) आहोत. त्यामुळे राऊतांनी चॅलेंज करु नये, असं गुलाबराव पाटील यांनी थेट आव्हान संजय राऊतांना दिलं आहे.

 

तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक येत आहेत – भुजबळ
गुलाबराव पाटील यांच्या आव्हानावर पलटवार करताना राष्ट्रवादीचे नेते (NCP) छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही दगड मारुन सभा उधणार आहात.
पण ते शिक्षण ज्या शाळेतील मास्तरांकडे घेतलं तेच येणार आहेत ना तिथे सभेला.
ती काय दुसरी मंडळी नाहीत. तुमच्याच शाळेतील मुख्याध्यापक (Principal) येत आहेत, अशी सूचक प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

 

तर माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) म्हणाले, आम्ही सध्या सभा घेणारे आहोत, उधळणारे नाही.
सध्या आम्हाला सभा घ्यायची आहे, उधळवायची नाही. ज्यांना उधळवायची आहे त्यांनी यावं, असं परब यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Political News | NCP leader Chhagan bhujbals reaction to gulabrao patils statement said the head master of your school

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dagdusheth Ganpati | दगडूशेठ गणपती : श्री गणेश व देवी शारदा यांचा शारदेश मंगलम् विवाह सोहळा थाटात

PM Kisan Samman Nidhi | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

Maharashtra Tourism – MTDC | पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; 15 मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन