Maharashtra Political News | अजित पवारांसह ‘या’ दोन नेत्यांची अमित शहांबरोबर बैठक झाली, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | भाजपसोबत (BJP) जाण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीवर दबाव आणला जात आहे. कुणाला त्यांच्यासोबत जायचं असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. मात्र, रात्रष्ट्रवादी कुणासोबत (Maharashtra Political News) जाणार नाही, असं शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सांगितल्याचा दावा राऊतांनी (MP Sanjay Raut) केला आहे. संजय राऊत यांनी सामनातील आजच्या रोखठोकमधून हा खळबळजनक दावा केला आहे.

 

संजय राऊतांनी केलेल्या खळबळजनक दाव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Shinde Group MLA Sanjay Shirsat) यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीतील (Maharashtra Political News) काही लोक फुटतील, याला शरद पवारांची मुक संमती आहे, असं शिरसाट यांनी म्हटले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

शिरसाट पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंना बोलवून शरद पवार यांनी इशारा दिला असावा, असं माझं मत आहे. दीड तासांची बैठक चहा, पाणी करुन किंवा एक वाक्य बोलून होत नसते. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम वाजवायचा होता तो वाजवला आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहत नाही, त्यासाठी ते कुणाबरोबरही युती (Alliance) करायला तयार असतात. त्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) त्यांना राहायचं नाही. त्यांचा कल भाजपकडे आहे. म्हणून ते भाजपबरोबर जातील, असं शिरसाट यांनी सांगितलं.

अमित शहांबरोबर बैठक झाली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही लोक फुटतील, कारण त्याला शरद पवारांची मुक संमती आहे. अजित पवार (Ajit Pawar), प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी अमित शहांबरोबर (Amit Shah) 8 एप्रिलला ठरवून बैठक केली. उद्या राष्ट्रवादी भाजपाबरोबर आल्यास नवल वाटण्यासारखं काहीच नाही, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला आहे.

 

आम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही
अजित पवार भाजपसोबत गेल्यास शिवसेनेची (Shivsena) काय भूमिका असणार? असे विचारले असता शिरसाट म्हणाले,
अजित पवारांना त्यांची कातडी वाचवायची आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवब मलिक (Nawab Malik),
हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची ईडीकडून चौकशी (ED Inquiry) सुरु आहे.
मग, त्यांना भीती नाही का? फक्त तुम्हालाच भीती आहे का? हे सगळं खोटं आहे.
परंतु आम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही, भाजपने काय करावं हा त्यांचा प्रश्न असल्याचे शिरसाटांनी स्पष्ट केलं.

 

Web Title :- Maharashtra Political News | sanjay shirsat on ajit pawar meet amit shah over alliance ncp bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | नागपूरमधील मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत, स्वत:च केला खुलासा; राजकीय चर्चांना उधाण

Chandrakant Patil | मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरणावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत पाटील

BARTI Pune | बार्टी संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी