Maharashtra Political News | अजित पवारांच्या मुद्यावरुन शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार?, शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण (Maharashtra Political News) ढवळून निघाले आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार या चर्चांमुळे शिवसेना शिंदे गटालाही (Shiv Sena Shinde Group) धक्का बसू शकतो. त्यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून भाजप किंवा शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत आहे. परंतु राष्ट्रवादीचा गट घेऊन ते भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला. मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली. (Maharashtra Political News)

संजय शिरसाट पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माझी काल मुख्य प्रवक्ते म्हणून निवड केली आहे. कालपासून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अजितदादा चर्चेचा विषय आहेत. त्यांचा फोन नॉट रिचेबल लागणे हे नवीन नाही. पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून दादा नाराज आहेत. मात्र त्यांची नाराजी आणि आमच्या सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालाचा काही संबंध नसल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शरद पवारांनी (NCP Chief Sharad Pawar) अजितदादांना मोहरा केलं.
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मेळाव्यात दादांचं स्थान शोधावं लागतंय.
टाईम साधणारा नेता अशी ओळख असलेल्या नेत्याला बोलू दिले जात नाही.
नागपूर येथील सभेत 10 मिनिट बोलू दिलं असतं तर काय झालं असतं. मात्र त्यांना बोलू दिलं नाही.
तसेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मला सांगितलं होतं की,
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना अजित पवार यांचेही फोन उचलत नव्हते.
तेव्हापासूनच अजित पवार यांची नाराजी आहे, असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला.

आघाडीत बिघाडी झालेली आहे. दादा राष्ट्रवादी सोडून आले तर स्वागत आहे.
दादांच्या येण्याने आमच्यात अस्वस्थता नाही. अजित पवार निघाले तर त्यांची वैचारिक भूमिका स्वतंत्र आहे.
सगळ्याच पक्षाचे चलबिचल आहे. 15 आमदार असलेला पक्ष मार्गदर्शन करत असल्याने दादांची नाराजी आहे.
काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीसोबत राहू नये याविरोधात आम्ही उठाव केला होता.
सध्या अजित पवारांना मोकळीक नाही. त्यांनी राष्ट्रवादी सोडली तर त्याचं स्वागत आहे.
आम्ही सत्तेत राहणार नाही, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.

Web Title :-  Maharashtra Political News | shivsena will not remain in power if the ncp group with ajit pawar comes to power says shivsena shinde camp spokesperson sanjay shirsat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले- ‘ही चर्चा…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – पांडवनगरमध्ये गुंडांचा राडा; टोळीच्या वर्चस्वातून तरुणावर जीवघेणा हल्ला करुन 4 चारचाकी, 14 दुचाकींची तोडफोड

Harshad Dhage – Pune News | समाजसेवक ‘हर्षद ढगे’, ‘फॉर फ्यूचर इंडिया’ मार्फत करतोय पर्यावरणाचं रक्षण