Maharashtra Political News | ‘अमित शहांनी अजित पवारांना विचारलं असेल, बाबा रे 70,000 कोटींचं व्याज….’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) रविवारी (दि.6) पुण्यात आले होते. यावेळी नव्याने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील झालेले अजित पवार (Ajit Pawar) आणि अमित शाह पहिल्यांदाच एकत्र व्यासपीठवर आले होते. (Maharashtra Political News) यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी अजित पवार यांचा उल्लेख करत म्हणाले, अजितदाद तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे यायला तुम्ही थोडा उशीर केला. यावेळी शहांनी अजित पवारांचे कौतुक केलं. यावर काँग्रेस (Congress) कडून प्रतिक्रिया आली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अजित पवार आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, आता महाराष्ट्रात सगळेच जण मुख्यमंत्री (CM) झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा विकासच झाला नाही. काहींना वाटतंय की फक्त अजित पवारच असे आहेत ते राज्याचा विकास करु शकतील. मात्र, महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक बदनाम करणाऱ्या लोकांच्या बरोबर जाऊन त्या खुर्चीला अजित पवार न्याय देऊ शकतील का? असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला आहे. (Maharashtra Political News)

70,000 कोटींचं व्याज…

वडेट्टीवार पुढे म्हणाले, काल खूप कौतुक झालं म्हणे, अमित शाह यांनी कौतुक केलं. कानातही कुजबूज केली म्हणे. कदाचित अमित शाह यांनी अजित पवार यांना विचारलंही असेल, बाबा रे 70,000 कोटींचं व्याज बरोबर येतंय ना? ते पैसे सुरक्षित ठेवले आहेत का? कुठल्या तिजोरीत ठेवलेत? असं त्यांनी कानात विचारलं असेल. नाहीतर ते म्हणाले असतील आता विसरुन जा बाबा, आम्ही केलेला आरोप.

असंच खात रहा पुढे जात रहा

अमित शहा अजित पवारांच्या कानात म्हणाले असतील, तुम्ही खाल्ले की नाही खाल्ले… पण आम्ही तुम्हाला बदनाम केलं.
परंतु, पुढच्या वेळी मात्र तुम्हाला सर्वात इमानदार, प्रामाणिक म्हणू. जगातील सर्वात प्रामाणिक कोण असेल तर ते
अजित पवार आहेत, असं आम्ही सांगू. म्हणून पाठीवर थापसुद्धा दिली. असंच खात राहा पुढे जात राहा,
असंही अमित शाह म्हणाले असतील, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Constipation | सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात मिसळून प्या ‘या’ गोष्टी, पोटातील घाण होईल स्वच्छ; बद्धकोष्ठतेपासून क्षणात होईल सुटका

Pune PMC News | भूसंपादनाच्या बदल्यात टीडीआर देण्याची प्रक्रिया अधिक गतीमान करणार