Maharashtra Political News | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पाणी पिणे देखील सोडण्याचा दिला इशारा; ‘जीआर आला नाही तर…’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | महाराष्ट्राचे राजकारण मराठा आरक्षण (Maratha Reservations) आंदोलनावरुन खूप तापले आहे. सत्ताधारी व‌ विरोधक एकमेंकांवर आरोप प्रत्यारोप करत असून जालन्यामध्ये नेत्यांची वारी चालू आहे. मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यावर विरोधकांनी ताशेरे ओढले आहे.

या आंदोलनामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण केले आहे.(Maharashtra Political News) आता मनोज जरांगे यांनी सरकारला उद्यापासून पाणी पिणे देखील सोडणार असल्याचा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून जालन्यामध्ये मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत.
त्यांनी आता माध्यमांसमोर आपली मते मांडली असून सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास पाणी पिणे देखील सोडण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे म्हणाले की, “उपोषणस्थळी येणारे शिष्टमंडळ राज्यातील मराठा समाज बांधवाला आरक्षण दिल्याचा जीआर घेऊन येतील, अशी आम्हाला आशा आहे. शासनाने योग्य निर्णय घेतला नसेल, आरक्षणाचा जीआर आला नाही तर उद्यापासून पाणी पिणेही सोडणार आहे.” असे मत मनोज जरांगे यांनी मांडले आहे.

दरम्यान महायुती सरकारच्या नेत्यांनी आज (दि.4) पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच मनोज यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करत असल्याचे देखील सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा मांडल्या आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे आमच्या लक्षात आले आहेत.
आरक्षणारच्या बाबतचा निर्णय झालेला नसावा. आपण आता त्यांचे लोकं येईपर्यंत वाट पाहू. अधिकृत मांडणी त्यांनीच केलेली बरी. चर्चेसाठी बैठकाचे दरवाजे खुले आणि चर्चेचे गुऱ्हाळ तेच, हे आताच्या आंदोलन करणाऱ्या पिढीला अपेक्षित नाही.
चर्चेशिवाय पर्याय नाही. परंतु, त्याचा अर्थ असा नाही की पहिले पाढे पंचावन्न असावेत.” असे‌ ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

सरकारचे शिष्टमंडळ मराठ्यांच्या विजयाचा कागद, आरक्षणाचे पत्र घेवून येईल, अशी आम्हाला आशा आहे.
आम्ही सरकारच्या शिष्टमंडळाची आणि निरोपाची देवासारखी वाट पाहत आहोत.
परंतु, आरक्षणाचा जीआर आला नाही तर उद्यापासून पाणी पिणेही बंद करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला.
तर आरक्षणाची दिशा परवा ठरवू मराठा समाजातील तरूणांच्या कणाकणात ऊर्जा आहे.
त्यामुळेच आपल्याला ऊर्जा मिळत असल्याचे जरांगे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

आरक्षण मिळेपर्यंत आपण थांबणार नाही. आरक्षणाबाबत योग्य निर्णय न झाल्यास उद्यापासून पाणी पिणे बंद
करणार असून, बुधवारी आरक्षणाची पुढील दिशा ठरविली जाईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला
(Maharashtra Political News) दिला आहे. आंदोलकांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे मागे घ्यावेत.
अशी देखील मनोज जरांगे यांची मागणी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रोड परिसरात खून; प्रचंड खळबळ