‘नारायण राणेंच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले’, शिवसेनेच्या ‘या’ खासदाराकडून ‘कडवी’ टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नारायण राणे यांच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले अशी टिपण्णी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ट्विटरवर ट्विट करत त्यांनी नारायण राणेंना सणसणीत टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या मदतीनं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि सत्तास्थापनेचा दावा केला होता. परंतु राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार अजित पवारांनी आपला भाजपचा पाठिंबा काढला आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर विनायक राऊतांनी टिपण्णी केली आहे.

राणेंवर निशाणा साधताना आपल्या ट्विटमध्ये विनायक राऊत म्हणतात, “अखेर नारायण राणे यांच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले. आता नारायण राणे यांनी गणिताचा अभ्यास करत बसावे.” असे म्हणत टोला लगावला आहे.

अजित पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि पक्षात परतल्यानंतर आता महाविकासआघाडीचा सत्ता स्थापनेसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान कालपर्यंत भाजप दावा करत होतं की, राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवार हे आमच्या सोबत आहेत. त्यामुळे सरकार आमचचं येणार आहे. उद्या त्याची बहुमत चाचणीही होणार होती. परंतु त्याआधीच आज अजित पवारांनी राजीनामा दिला आणि पक्षात परत आले. त्यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून भाजपवर जोरदार टीका होताना दिसत आहे.

Visit : Policenama.com