पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) युती करुन राज्यात सरकार स्थापन केले. शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला. तसेच इतर पक्षातील नेत्यांनी देखील शिंदे गटाची वाट धरली आहे. असे असताना आता अजित पवार (Ajit Pawar) यांचे कट्टर समर्थक आणि पिंपरी मतदारसंघाचे (Pimpri Constituency) आमदार आण्णा बनसोडे (MLA Anna Bansode) यांनी मंगळवारी (दि.31) मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला. या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चांना उधाण आले आहे.
आण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातून सुरु झाला. त्यापूर्वी ते पानाची टपरी चालवत होते. अजित पवार यांनी आण्णा बनसोडे यांना उमेदवारी देऊन आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात घातली. आण्णा बनसोडे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत गाडीतून प्रवास देखील केला. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील एकमेव राष्ट्रवादीचा आमदार फुटला तर हा पक्षाला मोठा फटका बसू शकतो का, हे पहावे लागेल. (Maharashtra Politics)
आण्णा बनसोडे यांचा 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत पराभव झाला होता. त्यानंतर ते राजकारणापासून दूर झाले होते. मात्र,2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा पिंपरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते आमदार झाले. मात्र, त्यांच्या मुख्यमंत्री भेटीनंतर ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतात की काय अशी चार्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आण्णा बनसोडे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे येणारा काळच स्पष्ट करेल.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आण्णा बनसोडे आणि अजित पवार यांच्यात बिनसले होते.
आगामी निवडणुकीमध्ये पिंपरीमधून नव्या उमेदवाराला राष्ट्रवादी तिकीट देणार असल्याची चर्चा आहे.
भाजप आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांच्या अंत्यविधीच्यावेळी बनसोडे हे मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेल्याचे पाहायला मिळाले होते.
त्यामुळे त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे आण्णा बनसोडे शिंदे गटात
जाणार असल्याची चर्चा आता पिंपरी मतदारसंघात रंगू लागली आहे.
Web Title :- Maharashtra Politics | ajit-pawar-close-aide-ncp-pimpri-chinchwad-mla-anna-bansode-meet-cm-eknath-shinde-in-mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Community Health Officer | मोठी बातमी! राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे उद्या कामबंद आंदोलन
Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या नव्या फोटोने वेधले लक्ष; नथ परिधान करत केले चाहत्यांना घायाळ