Maharashtra Politics | चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला अजित पवार यांचे जोरदार प्रतिउत्तर; म्हणाले…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात सध्या चांगलीच जुंपली असून दोघांकडूनही जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. (Maharashtra Politics) हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते. असे वक्तव्य केले होते. त्यावरून आज पुण्यात बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मग चार दिवस लपून का बसला होतात? असा सवाल केला होता. त्याला आज दि.८ रोजी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. (Maharashtra Politics)

 

चंद्रकांतदादा पाटील पुण्यात बोलताना म्हणाले होते की, ‘उठसुट दुसऱ्यांना टपली मारण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. (Maharashtra Politics) लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे, पण एखाद्यावेळा प्रतिक्रिया आली तर ती किती मोठी असते याचा अनुभव तुम्ही घेतला, त्यानंतरही तुम्ही उद्दामपणेच बोललात, आम्ही कुणाची काळजी करत नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही म्हणता. मग ४ दिवस कुठे दडून बसला होतात, घाबरत नव्हतात तर? दुसऱ्यावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

त्यावर कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रतिउत्तर दिले.
(Maharashtra Politics) अजित पवार म्हणाले, ‘राज्याचे हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपल्यानंतर पत्रकारांशी बोललो.
त्यानंतर शनिवारी मुंबईला आलो. रविवारी 1 जानेवारी होती, आणि 2 जानेवारीपासून पुन्हा कामाला सुरूवात केली.
कुठे बसलो होतो? कुणीही अशाप्रकारे टीका केली, तरी त्या टीकेत तथ्य आहे का नाही, आपल्यालाही कळलं पाहिजे.
अजित पवार घाबरून बसणारा नाहीये.’ असा पुनरूच्चार अजित पवार यांनी यावेळी बोलताना केला.

 

Web Title :- Maharashtra Politics | ajit pawar reacts on chandrakant patil allegations of chhatrapati sambhaji maharaj dharmveer controversy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ajit Pawar | अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना फटकारलं, म्हणाले – ‘लोकप्रतिनिधी झाला म्हणजे शिंगे फुटली का?’

Lady Police Constable Suicide | धक्कादायक! नाईट ड्युटीवरुन येताच महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या