Maharashtra Politics | बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाला उद्धव ठाकरे जाणार? आदित्य ठाकरे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सोमवारी (दि.23) जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विधिमंडळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण (Balasaheb Thackeray Oil Painting Inauguration) करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु असून कार्यक्रमाचे आमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख आणि बाळासाहेब ठाकरेंचे पूत्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही देण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांच्याहस्ते उद्धव ठाकरे यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे जाणार का? असा प्रश्न उपस्थित (Maharashtra Politics) होत असताना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. हा राजकीय कार्यक्रम असल्याने उद्धव ठाकरे जाणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

आदित्या ठाकरेंचा कार्य़क्रमावर आक्षेप
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमावर टीका केली आहे. या गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्राचं अनावरण झालं असं माझे आजोबा म्हणतील, असा टोला त्यांनी लगावला. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या आजोबांच्या तैलचित्राचं अनावरण होणार असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. (Maharashtra Politics)

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, कशाची भीती होती म्हणून सुरतला पळून गेलात, तुम्ही असं काय खाल्लं होतं
जे अपचन झाल्यानंतर पचन होण्यासाठी एवढ्या दूर जावं लागलं? असा सवाल त्यांनी केला.
ही टोळी उद्योगात घुसल्यानंतर आपलं काही खरं नाही, म्हणून उद्योग राज्याबाहेर जात असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.
तसेच राज्यात बोगस कंपन्या आणल्या असून पत्रकार परिषद घेऊन याचा भांडाफोड करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

 

दरम्यान, राज्यातील 288 आमदार, 78 विधान परिषदेचे सदस्य यांच्यावतीने हा कार्य़क्रम होत असल्याने तो सर्वांगीण स्वरुपाचा आहे.
त्यामुळे कुणीही कार्यक्रमाची उंची कमी होईल, असं विधान कुणीही करु नये असं आवाहन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | balasaheb thackeray oil painting inaugaration in vidhi mandal will uddhav thackeray go aaditya thackeray reacts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | ‘पक्षाला पूर्णवेळ देणारा पक्षाध्यक्ष असावा, घरात बसून…’, शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Health Tips | रिकाम्यापोटी चुकूनही खाऊ नका या 5 वस्तू, आरोग्याला होऊ शकते हे मोठे नुकसान

Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान