Maharashtra Politics | ‘तो माझ्या आयुष्यातील दु:खाचा क्षण’, उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतलेल्या आमदाराचं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्षात बंडखोरी (Rebellion) करुन भाजपच्या (BJP) मदतीने सरकार स्थापन केले. यानंतर दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप (Maharashtra Politics) सुरु आहे. रविवारी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेना पुन्हा एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत एक भावनिक वक्तव्य केले आहे.

 

गुलाबराव पाटील म्हणाले, मी मंत्रिमंडळात (Cabinet) काम सुरु केल्यापासून सर्व गावांसाठी आम्ही पाण्यासाठी कामं केलं आहे. नागरिक खूष आहे, लोकांचा चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळत आहे. मात्र, ज्यावेळी शिवसेनेत हा (Maharashtra Politics) प्रकार घडला. उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही. त्यामुळे आम्हाला हा मार्ग स्विकारावा लागला, तो माझ्या आयुष्यातील दु:चा क्षण आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

 

काय म्हणाले दीपक केसरकर?
ज्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांसाठी लढा लढवला ते सहजासहजी सोडून जात नाहीत.
निश्चितपणे काहीतरी घडलेलं आहे, ज्यामुळे आमदार बाहेर पडले.
नेमकं काय घडलं होते, याचे उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे.
उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले तर शिवसेना पुन्हा एकसंघ होण्यास वेळ लागणार नसल्याचे सूचक विधान दीपक केसरकर यांनी केले.

 

Web Title :- Maharashtra Politics | being away from uddhav thackeray is the saddest moment of my life says minister gulabrao patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चांगलीच खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे ते ट्वीट

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल