Maharashtra Politics | नक्की कोण करतयं बीडच्या राजकारणात ढवळाढवळ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या सध्या उपमुख्यमंत्र्यांच्या सभेला हजर राहत नाहीत. असे निदर्शनास आले होते त्यातच त्यांनी बीड जिल्ह्याच्या राजकारणावर एक सूचक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात (Beed Politics) चर्चांना उधान आले आहे. (Maharashtra Politics)

बीड जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे बीड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘पंकजाताई (Pankaja Munde) त्यांचा जिल्हा चांगला सांभाळत आहेत, त्यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्व आहे. त्या एक चांगल्या नेत्या आहेत. त्या राष्ट्रीय सचिव आहेत, त्यामुळे त्यांना कुठलीही आडकाठी नाही. बाहेरच्या लोकांनी येवून ढवळाढवळ करू नका या पंकजा मुंडेंच्या भावना आहेत. तसेच त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे.’ असे यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (Maharashtra Politics)

तसेच, यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, ‘उरलेले आमदार पळून जाऊ नये. १६४ चे १८४ होऊ नये अशी भीती उद्धव ठाकरे यांच्या गटाला वाटत आहे. त्यामुळे आपले आमदार थांबविण्याकरता ते काहीही बोलत आहेत. हे सरकार पूर्ण चालेल, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे चांगले काम करत आहेत. जनतेला या नवीन सरकारकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे आता या सरकारवर टीका ही ठाकरे गटाकडून केवळ आपले शिल्लक राहिलेले आमदार टिकविण्याकरता करण्यात येत आहे.’ अशी टीका देखील यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर केली.

निवडणुक आयोगासमोर (ECI) चाललेल्या शिवसेना पक्षाच्या सुनावणीवर देखील त्यांनी यावेळी बोलताना भाष्य केले. ते म्हणाले, ‘शिवसेनेच्या चिन्हाबाबत ही केस निवडणूक आयोगाकडे सुरू आहे.
ही केस सुप्रीम कोर्टाकडे नाही आयोगाला जे योग्य वाटतं नियमाप्रमाणे आयोगाने तो निर्णय घ्यावा,
त्यामुळे आमची काही भूमिका नाही. आयोगाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने कायदे डॉक्युमेंट दिले आहे.
दरम्यान, सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्याकडून अद्याप पाठिंब्याकरिता विचारण्यात आलेले नाही.
जर त्यांनी समर्थन मागितलं तर पक्षश्रेष्ठींशी बोलून त्यावर निर्णय घेऊ.’
असंही यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Web Title :-  Maharashtra Politics | bharatiya janata party along with pankaja munde will inform party leaders say chandrasekhar bawankule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | पार्थ पवार – शंभूराज देसाई भेटीवर बोलले अजित पवार; म्हणाले…

Sandeep Deshpande | मुंबईत कोरोनाकाळात मोठा घोटाळा; मनसे नेते संदिप देशपांडे यांचा खळबळजनक दावा, २३ जानेवारीला सादर करणार पुरावे

Maharashtra Politics | शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना धमक्या; विरोधात नर्स संघटनांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार