Maharashtra Politics | सोलापुरातील ‘या’ मोठ्या नेत्याने शिंदे गटात जाताच शिवसेना नेत्यांना सुनावले, पक्षनिष्ठा पक्षश्रेष्ठींना नाही का?

0
1370
Maharashtra Politics | big blow to uddhav thackerays shivsena in solapur bhausaheb andhalkar joining the shinde group
file photo

सोलापूर : Maharashtra Politics | सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून (Shivsena) जनतेची सेवा करणारे निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भेटून शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला. आंधळकर यांनी शिंदे गटात प्रवेश करताच म्हटले की, सर्वसामान्य शिवसैनिकांना (Shiv Sainik) आता मान-सन्मान राहिला नाही. बार्शी तालुक्यात शिवसैनिकांना साधी एंट्री देखील नव्हती. त्यावेळी शिवसेना वाढविण्यात मोठा प्रयत्न केला. तरीही नेते पक्षप्रमुखांना भेटू देखील देत नाहीत. (Maharashtra Politics)

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश करताना आंधळकर म्हणाले, सध्या शिवसेनेत फक्त करा कष्ट आणि खावा उष्ट अशी स्थिती झाली आहे. बार्शी तालुक्यात विरोधकांची जबरदस्त दहशत होती. शिवसेनेसाठी साधा भगवा धागा बांधणे देखील भीतीदायक होते. त्यावेळी शिवसैनिक म्हणून बार्शीमध्ये शिवसेना वाढवली.

आंधळकर पुढे म्हणाले, कोरोना काळात दहा ते पंधरा लाख लोकांना शिवसेनेमार्फत जेवण खाऊ घातले तरीही पक्षप्रमुख दखल घेत नाहीत. साध नाव घेऊन कौतुक देखील करत नाहीत म्हणून शिवसेना सोडून एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश करत आहे. (Maharashtra Politics)

आंधळकर म्हणाले, बार्शी तालुक्यात तीन वेळा विधानसभा निवडणुका (Assembly Elections) झाल्या.
2011 पासून बार्शी तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी कार्य केले.
आजतागायत आमदारकीचे तिकीट देताना तीन वेळा जाणूनबुजून डावलण्यात आले.
उलट मुंबईवरून पक्ष निरीक्षक म्हणून आलेले स्वतःचे खिशे भरून गेले.
उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेतील वरिष्ठ नेते आमची दखल घेत नाहीत.

Web Title :- Maharashtra Politics | big blow to uddhav thackerays shivsena in solapur bhausaheb andhalkar joining the shinde group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ICC T20 Ranking | पाक विरूद्धच्या जबरदस्त खेळीमुळे विराट बॅटिंग रँकिंगच्या टॉप-10 मध्ये, सूर्यकुमारला मात्र फटका

Esmayeel Shroff Passed Away | ज्येष्ठ दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचं निधन

Pune Crime | जमिनीच्या वादातून ट्रॅक्टर अंगावर घालून ४ वर्षाच्या मुलाचा केला खून; इंदापूरमधील घटना