बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | राज्यातील राजकारणात अलिकडे अनेक नवी राजकीय समिकरणे जुळून आली आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुक होणार आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील प्रमुख शहरांच्या महापालिका निवडणुका होणार आहे. त्यावर आता सर्वच राजकीय पक्षांकडून राजकीय पक्षप्रवेशांची मालिका सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळखल्या जाणाऱ्य बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जोरदार धक्का बसला आहे. बारामतीतील शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Maharashtra Politics)
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष रणनिती आखताना दिसत आहेत. त्याचाच भाग म्हणुन बारामतीतील (Baramati) शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाकडे पाहिले जाते. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या नेतृत्वात बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुका, करमाळा, सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. (Maharashtra Politics)
पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/R3jX3ZvH8V
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 25, 2023
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्वीट करून या पक्षप्रवेशाबाबतची माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘पुणे जिल्ह्यातील बारामती, दौड, इंदापूर
तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस आणि
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत
प्रवेश केला.’ मंत्रालयातील बाळासाहेब भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर (Kiran Pawaskar),
समन्वयक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) तसेच शिंदे गटाचे पदाधिकारी व सहकारी यावेळी उपस्थित होते.
Web Title :- Maharashtra Politics | big setback to ncp in baramati many office bearer left the party and join balasahebanchi shivsena shinde group
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update