Maharashtra Politics | तुम्ही सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या दावणीला बांधला, भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | स्मृतिस्थळाची ज्योत हलतेय, म्हणजेच बाळासाहेबांना त्रास होतोय असं सांगत 21 जूनला किशोरी पेडणेकर यांना अश्रू अनावर झाले होते. बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) अजूनही लक्ष आहे यावर किशोरीताईंचा (Kishori Pednekar) विश्वास होता. तुमचाही नक्कीच असेल. म्हणूनच, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाची वाताहत झाल्याचे खापर इतरांवर फोडू नका. ही तुमच्याच कर्माची फळे आहेत. तुम्ही सत्तेसाठी (Maharashtra Politics) बाळासाहेबांच्या शिवसेनेचा (Shivsena) वाघ काँग्रेसच्या (Congress) दावणीला बांधला. राष्ट्रवादीपुढे गुडघे टेकले. अशा शब्दात भाजपचे (BJP) प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) समाचार घेतला आहे.
बाळासाहेबांना कधीच मान्य नसलेली सत्तेची पदे स्वतःकडे घेतलीत आणि हिंदुत्वाला (Hindutva) लाज वाटणाऱ्या पालघर साधू हत्याकांड यावर मौन पाळले. काँग्रेसकडून होणारा सावरकरांचा (Swatantryaveer Savarkar) अपमान निमूटपणे सहन केलात, सत्तेच्या कैफात स्वाभिमानी आणि निष्ठावंत शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून दहशतवाद्यांशी साटेलोटे असलेल्या नवाबाच्या मांडीला मांडी लावून बसलात. राज्यातील जनता महामारी, अतिवृष्टी, वादळामुळे हतबल झाली असताना भ्रष्टाचारी मंत्र्यांना प्रोत्साहन दिलेत, आणि सत्तेचे सोने करून महाराष्ट्राला मोठे करण्याऐवजी घरात बसून स्वतःभोवती आरती ओवाळणाऱ्यांची टोळी तयार केलीत, असा खोचक टोला उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. (Maharashtra Politics)
ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसबरोबर जाईल त्या दिवशी मी हे दुकान बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले होते. तेव्हा तुम्ही खूप लहान होतात. पण बाळासाहेबांची तीच भावना कायम होती. आजही बाळासाहेबांचे शिवसेनेवर लक्ष आहे. त्या दिवशी त्यांच्या स्मृतीस्थळावरची ज्योत थरथरली तेव्हाच हे स्पष्ट झाले असे तुम्ही मानत असाल, तर शिवसेनेची वाताहत ही बाळासाहेबांनी तुम्हाला दिलेली शिक्षा आहे, असे समजा. काँग्रेससोबत जाऊन तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला, म्हणून त्यांच्या इच्छेमुळेच तुमचे दुकान बंद होत आहे, म्हणून जे काही घडत आहे, त्याला तुम्हीच जबाबदार आहात, असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
Web Title :- Maharashtra Politics | bjp answered shivsena uddhav thackeray criticism
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Pimpri Crime | दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय! पिंपरी चिंचवडमध्ये होतेय नामांकित कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Mulayam Singh Yadav Passed Away | समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Pune Crime | महिलेकडून न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची तरूणाला धमकी, धनकवडी परिसरात युवकाची आत्महत्या