Maharashtra Politics | आदित्य ठाकरे भारत जोडोत जाणार म्हणजे बुडत्याला गांधींचा आधार – भाजप

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरु असलेली कन्याकुमारी ते काश्मीर ही 3750 किमी पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते सहभागी होत आहेत. शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यावर आता भाजपच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी होणार म्हणजे बुडत्याला गांधींचा आधार, असे म्हंटले आहे. तसेच तैनाजी फौजेला मालकासमोर परेड करावीच लागते, असे देखील भातखळकर म्हणाले आहेत. (Maharashtra Politics)

या यात्रेत काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), अशोक चव्हाण (Ashok Chavan), काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge), राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) आणि खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) आदी लोकांनी हजेरी लावली आहे. तसेच आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर टीका सुरु केली आहे. “उद्या आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. बुडत्याला गांधीचा आधार. बेगर हॅस नो चॉईस. तैनाजी फौजेला मालकासमोर परेड करावीच लागते” असे अतुल भातखळकर म्हणाले आहेत. (Maharashtra Politics)

भारत जोडो यात्रा मंगळवारी महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर या ठिकाणी दाखल झाली.
त्यावेळी यात्रेचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले गेले. या यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
तसेच या यात्रेत तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
या यात्रेला महाविकास आघाडीतील नेते देखील हजेरी लावत आहेत.
त्यामुळे या यात्रेची लोकप्रियता वाढली आहे.
तसेच दिवसेंदिवस ही यात्रा न राहता एक चळवळच झाली आहे.

Web Title :-  Maharashtra Politics | bjp atul bhatkhalkar criticised shivsena thackeray group aaditya thackeray over participate in rahul gandhi bharat jodo yatra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update