Maharashtra Politics | RSS आणि पीएफआय दोन्हीवर बंदी घाला, काँग्रेसच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले – मुर्खासारखे बोलणारे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया Popular Front of India (PFI) ही संघटना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचे पुरावे मिळाल्याने भारत सरकारने तिच्यावर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. यावरून काँग्रेसचे (Congress) खासदार आणि लोकसभेतील प्रतोद कोडिकुन्निल सुरेश (Pratod Kodikunnil Suresh) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. या मागणीवर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Maharashtra Politics)

 

आरएसएस आणि पीएफआयची तुलना करताना कोडिकुन्निल सुरेश यांनी म्हटले की, या दोन्ही संघटना सारख्याच असून, दोघांवरही बंदी घातली गेली पाहिजे. आम्ही आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करत आहोत. पीएफआयवर बंदी घालणे हा काही उपाय नाही. आरएसएससुद्धा संपूर्ण देशात हिंदू जातियवाद पसरवत आहे.

 

कोडिकुन्निल सुरेश यांनी म्हटले की, आरएसएस आणि पीएफआय दोघेही सारखेच आहेत. त्यामुळे सरकारने दोघांवरही बंदी घातली पाहिजे. केवळ पीएफआयवर बंदी कशासाठी? (Maharashtra Politics)

सुरेश यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, असे मुर्खासारखे बोलणारे लोक अनेक आहेत.
या देशात कायदा आणि संविधान अस्तित्वात आहे. कुठल्याही संघटनेवर बंदी घालण्यासाठी पुरावे लागतात.
आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केरळमधील पूर्वीच्या काँग्रेस आणि कम्युनिस्ट सरकारांनीही केली होती.
भाजपशासित (BJP) किंवा इतर राज्यांमध्ये आरएसएसने पीएफआयप्रमाणे कृत्य केल्याचे ते शोधू शकले का.

 

काँग्रेस नेते खासदार दिग्विजय सिंह (MP Digvijay Singh) यांनी पीएफआयवरील कारवाईनंतर म्हटले होते
की, आरएसएस, पीएफआय एक ही थाली के चट्टे-बट्टे. द्वेष आणि हिंसाचार पसरवणार्‍या सर्वांवर कारवाई करण्यात यावी.
आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेवर कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल सिंह यांनी उपस्थित केला होता.

 

Web Title :- Maharashtra Politics | bjp leader devendra fadnavis criticised congress leader over demands of ban on rss

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांनी हिंदू समाजाची माफी मागावी, अन्यथा…, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा इशारा

Sunny Leone | बापरे! सनी लिओनीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक; अभिनेत्रीने स्वत:च केलं अलर्ट, म्हणाली…

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…