मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपच्या (BJP) कार्यक्रमात फारशा दिसत नव्हत्या. तसेच त्यांच्यात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यामध्ये छुपे मतभेद असल्याची चर्चा होती. त्यामुळेच त्यांना महाराष्ट्रातील राजकारणापासून (Maharashtra Politics) दूर ठेवत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिल्याचे देखील दावे केले जात आहेत. त्यातच अलिकडे ज्या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतात, त्या कार्यक्रमांना पंकजा मुंडे उपस्थित नसतात. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क उपस्थित केले जात आहेत. त्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (BJP-Shivsena Shinde Faction Alliance Government) आस्तिवात आल्यानंतर पंकजा मुंडे यांना या सरकारमध्ये महत्वाची भूमिका दिली जाईल. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, ही चर्चा हवेतच विरली. त्यामुळेच पंकजा मुंडे या नाराज असल्याचे बोलले जात आहे. २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात झालेल्या सत्तास्थापनेच्या गोंधळावर बोलताना त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून पंकजा मुंडे यांच्या मनात काही सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासोबत प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीस यांच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहण्याचे कारण सांगितले. (Maharashtra Politics)
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर उत्तर दिले आहे. ती माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. माझ्या मनात काहीही खदखद नाही. देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणं अपेक्षित नव्हतं. म्हणून मी तिथे नव्हते. आज माझे प्रदेशाध्यक्ष आले होते. त्यामुळे मी आले. जे पी नड्डा जेव्हा आले, तेव्हाही मी आले होते. मी भाजपची सच्ची कार्यकर्ती आहे. पक्षाबाहेरील कार्यक्रमांना जाणे मला बंधनकारक नाही.’ असं यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या.
Web Title :- Maharashtra Politics | bjp pankaja munde speaks on political tussle with devendra fadnavis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील 12 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या;
इंदापूर, यवत, जुन्नर, शिक्रापूर, खेड, बारामती तालुका, दौंड, आळेफाटा पोलिस ठाण्यात नियुक्त्या - Maharashtra Political Crisis | धनुष्यबाण आणि शिवसेना कुणाची? यावर निवडणुक आयोगापुढे आज पुन्हा सुनावणी
- Pune Police News | पुणे पोलिस दलास नेमबाजीत विजेतेपद ! सीपी रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक,
अपर आयुक्त डॉ. जालींदर सुपेकरांनी केले स्पर्धकांचे अभिनंदन