Maharashtra Politics | बावनकुळेंच्या युटर्न नंतर चंद्रकांत पाटलांचे जागावाटपाबाबत मोठं विधान, म्हणाले-‘आमची तयारी शिवसेनेला…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections-2024) भाजप 240 जागा तर शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) 48 जागा लढवणार असल्याचे विधान भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत आपल्या विधानावरुन युटर्न घेतला. मात्र, बावनकुळे यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून राजकीय नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया (Maharashtra Politics) येत आहेत. बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टिकरण दिल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जागावाटपाबाबत मोठं विधान केलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणुकीची तयारी करत आहे. त्यात शिवसेनेला किती जागा जातील हे आतापासून ठरवण्याचे कारण नाही. आमची तयारी शिवसेनेला (Maharashtra Politics) उपयोगी पडेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असून त्यांनी महापालिकेच्या (PCMC) वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या शंकरराव मासुळकर हेल्थ केअर सेंटर (Shankarao Masulkar Healthcare Center) आणि आय हॉस्पिटलचे (Eye Hospital) उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.
संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत (Government Employees Strike) बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.
त्यासाठी आयपीएस अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे.
तरी देखील अत्यावश्यक सेवेतील संपकरी हे देखील संपात सहभागी झाले आहेत.
मात्र, हा काळ विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा असल्याने तसेच रुग्णांचे मोठे हाल होत असल्याने संपकऱ्यांनी कामावर परत यावे असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.
Web Title :- Maharashtra Politics | chandrakant patils reaction on the alliances assembly allocation
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला
Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले