Maharashtra Politics | शरद पवार यांच्या खेळीमुळे, अजित पवारांचा बकरा झाला; चंद्रशेखर बावनकुळेंचा राष्ट्रवादीवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | एका वृत्तवाहिनीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या देवेंद्र फडणवीसांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले होते. तसेच त्यावेळी बोलताना अजित पवार यांचा शपथविधी ही शरद पवार (Sharad Pawar) यांची खेळी असू शकते. असे देखील जयंत पाटील म्हणाले होते. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जोरदार निशाणा साधला. बावनकुळे म्हणाले की, शरद पवार यांच्या शकुनीमामासारख्या खेळीमुळे अजित पवार यांचा बकरा झाला. तसेच पहाटेच्या शपथविधीच्या कटात उद्धव ठाकरे यांचा देखील हात होता. असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यावेळी बोलताना म्हणाले. (Maharashtra Politics)
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांचं नाव घेऊन त्यांनी खेळी केली असा दावा केला. यातूनच हे स्पष्ट झालंय की बहुमत मिळालेल्या देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सत्तेत येऊ न देण्यासाठी हे केलं आहे. शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून ही खेळी करण्यात आली. शकुनीमामा सारखी दुष्ट खेळी त्यांनी केली. त्यासाठी आपल्याच घरचा ऊर्जावान कार्यकर्ता अजित पवार यांचा बळीचा बकरा करावा लागला.’ अशी टीका यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.
आजपर्यंत आम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच फडणवीस यांच्याविरोधात कट केला होता, असे समजत होतो. मात्र आता जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यामागे शरद पवार यांचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे निर्दोष सिध्द होत नाहीत. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही या कटात सहभागी होते. या प्रकरणामुळे शरद पवार यांनी आपली महाराष्ट्रातील प्रतिष्ठा गमावली आहे. अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना शरद पवार यांच्यावर केली. ‘जर जयंत पाटील खोटं बोलत असतील तर जयंत पाटील शरद पवारांना का बदनाम करत आहेत असा प्रश्न निर्माण होतो. त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही म्हणून हे होत आहे का? की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांची घुसमट होत आहे?’ असा सवाल देखील यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. (Maharashtra Politics)
राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ईडीची चौकशी ही काय देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरून लागत नाही. तर कोणाच्या तरी तक्रारीनंतर लागते. चौकशा चालूच राहतात. महाविकास आघाडीने देखील माझी चौकशी केली होती. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ न देण्यासाठी शरद पवार यांना अजित पवारांचा बळीचा बकरा करावा लागला. हे सर्व आज ना उद्या शरद पवार यांना जनतेला सांगावं लागेल की त्यांनी असं षडयंत्र का केले? नाहीतर जयंत पाटील खोटं बोलत आहे हे तरी सांगावे लागेल. असे देखील यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
तर नाशिक पदवीधर निवडणुकीवर (Nashik Graduate Constituency) बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाशिकमध्ये आमचा एबी फॉर्म नाही.
तिथे अपक्षांमध्ये चुरस आहे. भाजप आणि शिंदे गट हे कधीच महाविकास आघाडीला मतदान करणार नाहीत.
ते अपक्षाला मतदान करतील. अजून सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी पाठिंबा मागितला नाही.
शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत.
त्यामुळे भाजपचा कुठलाही कार्यकर्ता महाविकास आघाडीला मतदान करणार नाही.
तो कुठल्याही अपक्षाला मतदान करेल. तो कुठल्या अपक्षाला करेल. हे आज मला माहित नाही.
त्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल. असे म्हणत नाशिक पदवीधर मतदार संघातील भाजपचा पाठिंबा कुणाला असणार? या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात ठेवले.
Web Title :- Maharashtra Politics | chandrashekhar bawankule on sharad pawar uddhav thackeray and ajit pawar devendra fadanvis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…