मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections-2024) अनुषंगाने युतीच्या जागा वाटपसंदर्भात वक्तव्य केलं. यावरुन भाजप-शिंदे गटात (Shinde Group) नव्या वादाला तोंड फुटताना दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला Shievsena (शिंदे गट) 48 जागा देण्याचे विधान बावनकुळे यांनी केलं होतं. यावरुन (Maharashtra Politics) शिंदे गटाच्या आमदारांनी बावनकुळे यांना खडेबोल सुनावले आहेत.
48 जागा लढवायला आम्ही मूर्ख आहोत का?
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही दम नाही. त्यांना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. कोणी दिले त्यांना अधिकार.. अशाप्रकारे वक्तव्य केल्याने युतीमध्ये बेबनाव येते, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. आम्ही काही मूर्ख आहोत का? फक्त 48 जागा लढवण्यासाठी, त्याच्यासाठी वरिष्ठ पातळीवर (Maharashtra Politics) बैठक होईल आणि तिथे काय तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे त्यांना तो निर्णय जाहीर करु द्यावा.
बावनकुळे यांना कोणी अधिकार दिला आहे? अशामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होत असते. बावनकुळे यांनी अतिउत्साहाच्या भरात असे विधान केले आहे. त्यांना वाटतं की, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष (State President) असल्याने माझ्या नेतृत्वाखाली जास्त जागा यायला पाहिजे. पण आपल्या अशा विधानामुळे सहकारी पक्षाला त्रास होतो. त्यामुळे आपल्याला जेवढे अधिकार आहेत तेवढेच बोलावं, अशा शब्दात शिरसाट यांनी बावनकुळेंना सुनावलं.
शिवसेना 125-130 जागा लढवणार- संजय गायकवाड
बावनकुळे यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad)
म्हणाले, कोण कुठला नेता काय म्हणतो त्याला काही महत्त्व नाही. आम्ही शिवसेना म्हणून 125 ते 130
जागा लढवणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेली शिवसेना आमची आहे.
ही शिवसेना आणि भाजपची युती (Shiv Sena-BJP Alliance) आहे.
त्यामुळे कोण कुठला नेता काही घोषणा करत असेल तर त्याला काही महत्त्व नाही.
आमची युती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह
(Home Minister Amit Shah) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DyCM Devendra Fadnavis)
या सर्वांसोबतचा विषय आहे. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही 125 ते 130 जागा लढवणार आहोत,
गायकवाड यांनी थेट आकडाच सांगून टाकला.
Web Title :- Maharashtra Politics | chhatrapati sambhaji nagar are we stupid to contest only 48 seats sanjay shirsat criticizes chandrasekhar bawankule
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update