Maharashtra Politics | शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट ! शिवसेनेतील आमदारानेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी घातलं होतं साकडं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेनेतीलच (Shivsena) एका आमदाराने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदावरून हटावावे आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वतः मुख्यमंत्री व्हावे, अशी गळ घातली होती, असा गौप्यस्फोट शिंदे गटाकडून (Shinde Group) करण्यात आला आहे. शिंदे गटाने राज्यात हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा सुरू केली आहे. या यात्रेतील एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटातील नेते आणि राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना हा गौप्यस्फोट केला. (Maharashtra Politics)

 

संदिपान भुमरे म्हणाले, शिंदे गटातून शिवसेनेत परतलेले आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होण्याची गळ घातली होती. ठाण्यावरून सुरतकडे जात असताना कारमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार (Abdul Sattar), नितीन देशमुख यांच्यासह मी स्वत: होतो. त्यावेळी नितीन देशमुख यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याची गळ घातली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खेचत तुम्ही स्वत: मुख्यमंत्री व्हा, असे देशमुखांनी एकनाथ शिंदेंना म्हटले होते. (Maharashtra Politics)

भुमरे म्हणाले, उद्धव ठाकरे हे आमदारांना सोडा, कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा भेटत नव्हते.
लाजेखातर पक्षप्रमुख आम्हाला भेटतात असे खोटे बोलावे लागत होते.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भुमरे पुढे म्हणाले, युतीच्या नावावर मते घेत
काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीसोबत (NCP) सरकार स्थापणारे तुम्हीच गद्दार आहात.
युती तुम्ही तोडली. मात्र, जनता आम्हाला जाब विचारत होती. महाराष्ट्राचा कारभार अडीच वर्ष ऑनलाईनच झाला.

 

Web Title :- Maharashtra Politics | cm eknath shinde group minister sandipan bhumre
criticised shivsena chief uddhav thackeray in hindu garv garjana yatra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा