Maharashtra Politics | पक्षात बंडखोरी करणार्‍या शिंदे गटाची पक्षप्रमुखांनाच ऑफर; उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू, पण अट एकच…

मुंबई : Maharashtra Politics | भाजपाच्या मदतीने शिवसेनेत बंडखोरी करून पक्षात उभी फूट पाडणार्‍या शिंदे गटाने (CM Eknath Shinde) 40 आमदार आणि 12 खासदारांच्या बळावर मविआ सरकारला (MVA Govt) पायउतार करून राज्याची सत्ता मिळवली (Maharashtra Politics). त्यानंतर पक्ष, पक्षचिन्ह, दसरा मेळाव्यावर हक्क सांगितला आहे. यावरून शिवसेना आक्रमक झाली असून दररोज शिवसेना आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता तर शिंदे गटाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच एक आवाहन केले आहे. एका अटीवर उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) स्वागत करू, अशी हास्यास्पद ऑफरच शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखांना दिली आहे.

शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली तर आम्ही त्यांचे स्वागत करू. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याची स्पष्ट भूमिका मांडावी. असे झाले तर शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार प्रकट होतील, हा संदेश शिवसैनिकांमध्ये जाईल. या भूमिकेचे आम्हीही स्वागत करू. (Maharashtra Politics)

शेवाळे म्हणाले, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी आम्ही जेव्हा परवानगी मागतो, तेव्हा हिंदुत्वाच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी आम्ही परवानगी मागत असतो. शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची दिशा संपूर्ण देशाला मिळते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा गट म्हणून आम्ही महापालिकेत अर्ज केला आहे. दुसरा गट हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे.

खासदार शेवाळे पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची परंपरा पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत.
ठाकरे गट हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतचा एक गट आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारा गट नाही.
त्यामुळे परवानगी कोणाला द्यायची? यावरून महापालिकेपुढे कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे.
आमची स्पष्ट भूमिका आहे की, शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे सोने लुटले पाहिजे.
शिवाजी पार्कवरून त्यांचे हिंदुत्वाचे आणि राष्ट्रहिताचे विचार प्रकट झाले पाहिजेत.

Web Title :- Maharashtra Politics | CM eknath shinde group mp rahul shewale said if uddhav thackeray left maha vikas aghadi then we will welcomed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Decisions | शिंदे-फडणवीस सरकारचं पोलिसांना गिफ्ट ! महाराष्ट्र पोलिसांच्या नैमित्तिक रजेत वाढ, 7231 पदांची पोलीस भरती होणार

Sharad Pawar To Shinde-Fadnavis Govt | शरद पवारांचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान, म्हणाले – ‘पत्राचाळ प्रकरणी लवकर चौकशी करा, आम्ही तयार’