Maharashtra Politics | ‘शेवटी काय भाजपचे संस्कार..!’ पंकजा मुंडेवरुन काँग्रेसचा भाजपला खोचक टोला, ‘तो’ व्हिडीओ केला शेअर (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) या नाराज असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. परंतु त्यांनी स्वत: यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही पंकजा मुंडे ह्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या असल्याचे म्हटले होते. परंतु गेवराई येथील कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांच्या अगोदर भाषण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना बावनकुळे यांनी पंकजा मुंडे त्यांच्या नाराजीबद्दल अफवा पसरवणारा (Maharashtra Politics) एक गट भाजपमध्येच असल्याचे म्हटले. याच दरम्यान काँग्रेसने पंकजा मुंडे यांच्यावरुन भाजपवर जळजळीत टीका केली आहे.

 

 

 

महाराष्ट्र काँग्रेसच्या (Maharashtra Congress) अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पंकजा मुंडे यांनी त्यांना बोलू देण्याची विनंती केली, परंतु बावनकुळे यांनी मुंडे यांना त्यांच्या आधी बोलू दिलं नाही. (Maharashtra Politics)

हा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रसेनं भाजपर निशाणा साधला आहे. जे स्वत:च्या पक्षातीलच
एका महिला प्रतिनिधीला भर कार्यक्रमात बोलून देत नसतील ते त्यांच्या पक्षाच्या
निर्णय प्रक्रियेत महिलेला काय स्थान देत असतील याचा विचार न केलेलाच बरा.
शेवटी काय भाजपचे संस्कार म्हटल्यावर असंच होणार!असं म्हणत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Politics | congress criticizes bjp over pankaja munde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा